कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट जगतावर लागलेला ब्रेक अद्याप पूर्णपणे हटलेला नाही. परंतु असे असले तरीही क्रिकेट तज्ज्ञ तसेच माजी खेळाडू आपापले संघ तयार करताना दिसत आहेत. अशामध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने आपला यूट्यूब चॅनेल ‘आकाशवाणी’वर २ संघांमधील तुलना केली आहे. त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार दिग्गज एमएस धोनीच्या आणि सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या विश्वचषकातील संघाची तुलना केली आहे.
आपल्या या चॅनेलवर त्याने २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय एकादश संघाच्या खेळाडूंची तुलना २०१९ विश्वचषकातील भारतीय एकादश संघाशी केली आहे. ८ वर्षांनंतर या दोन्ही संघात केवळ २ खेळाडू असे आहेत, जे या दोन्ही संघाचा भाग आहेत. हे दोन्हीही खेळाडू इतर कोणी नसून आजी-माजी कर्णधार म्हणजेच विराट आणि धोनी आहेत.
विराटच्या नेतृत्वातील विश्वचषक २०१९चा भारतीय संघ आतापर्यंतचा सर्वाधिक मजबूत संघ मानला जात होता आणि भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वाधिक प्रबळ दावेदार होता. परंतु उपांत्य सामन्यात संघ न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारत स्पर्धेतून बाहेर पडला.
चोप्राने सुरुवातीला सचिन तेंडुलकरची तुलना रोहित शर्माबरोबर केली. यामध्ये त्याने दोघेही सरस असल्याचे सांगितले. त्याला या दोन्ही खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगता आले नाही. त्यानंतर विरेंद्र सेहवाग आणि शिखर धवनची तुलना करत त्याने धवन श्रेष्ठ असल्याचे सांगितले.
चोप्राने या दोन्ही संघांतील खेळाडूंच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या आधारे एकमेकांची तुलना केली आहे तसेच कोण कोणावर भारी आहे हेदेखील सांगितले आहे. चोप्राने तिसऱ्या क्रमांकासाठी गौतम गंभीर आणि कर्णधार विराटची तुलना केला आहे. आणि यांमध्ये २०१९ चा विराट दमदार असल्याचे सांगितले. यानंतर युवराज सिंग आणि सुरेश रैना २०१९च्या खेळाडूंवर भारी असल्याचे सांगितले.
त्याने पुढे हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजाची तुलना करत जडेजाला पुढेे ठेवले. यानंतर गोलंदाजीमध्ये त्याने झहीर खान आणि जसप्रीत बुमराहची तुलना करत दोघेही बरोबरीत असल्याचे सांगितले. संपूर्ण संघांबाबत निर्णय घेत चोप्राने म्हटले की, धोनीच्या नेतृत्वातील संघ विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघापेक्षा अधिक श्रेष्ठ होता.
२०११ विश्वचषकातील धोनीचा भारतीय संघ-
सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, विराट कोहली, सुरेश रैना, एमएस धोनी, हरभजन सिंग, झहीर खान, मुनाफ पटेल, आशिष नेहरा/एस श्रीसंत
२०१९ विश्वचषकातील विराट कोहलीचा भारतीय संघ-
रोहित शर्मा, शिखर धवन/ केएल राहुल, विराट कोहली, दिनेश कार्तिक/ केदार जाधव, रिषभ पंत/ एमएस धोनी, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/ युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
-कोणत्या गोलंदाजाने कोणत्या वर्षात घेतली आपली ५००वी विकेट, वाचा थोडक्यात
-५०० विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडने केले आहे तब्बल एवढ्या फलंदाजांना क्लिन बोल्ड
ट्रेंडिंग लेख-
-कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारे ७ गोलंदाज, केवळ एक आहे भारतीय
-५०० विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने या ५ फलंदाजांना अक्षरश: रडवलंय, धोनी- रहाणे देखील…
-कसोटीत कारकिर्दीत कमी वयात ५०० विकेट्सचा टप्पा पार करणारे जगातील अवलिया