---Advertisement---

रेकॉर्डब्रेकर जिमी! वॅग्नरला बाद करताच मोडीत काढला मॅकग्राचा ‘तो’ विक्रम

On: रविवार, जून 13, 2021 9:11 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानची दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडने १-० अशा फरकाने जिंकली. मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत चौथ्या दिवशीच न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा पराभव केला. मात्र, इंग्लंडचा पराभव झाला असला तरी त्यांचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी ही कसोटी विक्रमी ठरली. या कसोटी दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचा एक विक्रम मागे टाकला.

अँडरसनने टाकले मॅकग्राला मागे
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या जेम्स अँडरसन याच्यासाठी ही कसोटी लक्षवेधी ठरली. त्याने या कसोटीसाठी मैदानात उतरताच इंग्लंडसाठी सर्वाधिक १६२ कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने या याबाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक याला मागे सोडले. अँडरसन आणि कूक हे दोनच असे खेळाडू आहे ज्यांनी इंग्लंडसाठी १५० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

या लक्षवेधी सामन्यात गोलंदाजी करताना जेम्स अँडरसनने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात नील वॅग्नर याला एकही धाव न करता बाद केले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. वॅग्नर हा अँडरसनने शून्यावर बाद केलेला १०५ वा फलंदाज ठरला. यापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या नावे होता. त्याने कारकिर्दीत १०४ फलंदाजांना शून्यावर बाद केलेले. शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन यांनी प्रत्येकी १०२ फलंदाजांना खाते खोलू दिले नव्हते.

सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज अँडरसन
जेम्स अँडरसन हा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या नावे आतापर्यंत ६१७ बळी आहेत. त्याच्या सर्वाधिक कसोटी बळींचा विश्‍वविक्रम श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या नावे असून, त्याने ८०० बळी मिळवले होते. दुसर्या आणि तिसर्या स्थानी अनुक्रमे ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न व भारताचा अनिल कुंबळे आहेत. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत ७०६ व ६१९ फलंदाजांना बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिल्या ६७ वर्षांत भारताने परदेशात जिंकल्या आहेत होत्या केवळ १३ कसोटी, कोहलीने ६ वर्षांत जिंकवल्या १५

केएल राहूल बॅक इन फॉर्म!! रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लगावला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल

आयसीसीकडून विनू मंकड यांना मोठा सन्मान; ५ युगांतील १० दिग्गजांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---