4 सप्टेंबरपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा ऍशेस कसोटी सामना सुरु होणार आहे. पण या सामन्याआधीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ऍशेस मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
शुक्रवारी(30 ऑगस्ट) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने चौथ्या ऍशेस सामन्यासाठी 13 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात अँडरसन ऐवजी क्रेग ओव्हरटनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ओव्हरटन शेवटचा कसोटी सामना मार्च 2018 मध्ये खेळला आहे.
अँडरसनला पोटरीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने उर्वरित ऍशेस मालिकेला मुकावे लागले आहे. त्याला या ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळताना पहिल्याच दिवशी 4 षटके गोलंदाजी केल्यानंतर पोटरीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यानंतर त्याने पहिल्या कसोटीत गोलंदाजी केली नव्हती.
तसेच या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यालाही मुकावे लागले होते. या दरम्यान गुरुवारी देशांतर्गत स्पर्धेत लँकाशायर सेकंड इलेव्हनकडून खेळताना त्याला पुन्हा या दुखापतीचा त्रास झाल्याने अखेर त्याला उर्वरित ऍशेस मालिकेतूनही बाहेर पडावे लागले आहे.
चौथ्या ऍशेस सामन्यासाठी ओव्हरटॉनला संधी देण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही बदल इंग्लंड संघाने केलेला नाही. त्यांनी तिसऱ्या कसोटीतील 12 जणांचा संघच चौथ्या कसोटीसाठीही कायम ठेवला असून त्यात ओव्हरटॉनला सामील केले आहे.
चौथा कसोटी सामना मँचेस्टरला ओल्ट ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे.
चौथ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा संघ –
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, सॅम करन, जो डेन्ली, जॅक लीच, क्रेग ओव्हरटन, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स.
James Anderson has been ruled out of the rest of the Ashes. #Ashes pic.twitter.com/bPRgh3yaLm
— ICC (@ICC) August 30, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीच्या टीम इंडियाबाबत असे दुसऱ्यांदाच झाले
–विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–अंबाती रायडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; ‘यांना’ दिले मन बदलण्याचे श्रेय






