---Advertisement---

केवळ २ षटकांत ५ विकेट्स घेणाऱ्या रसेलचा मोठा कारनामा; रोहित, झहीरलाही टाकले मागे

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 12:27 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १५३ धावांचा बचाव करताना १० धावांनी विजय साजरा केला. केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्यात अष्टपैलू आंद्रे रसेलने अप्रतिम गोलंदाजी करत ५ बळी मिळवून मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले होते. यासोबतच रसेलचा समावेश गोलंदाजांच्या एका खास यादीत झाला.

दिग्गज गोलंदाजांच्या यादीत झाला समावेश
केकेआरचा प्रमुख अष्टपैलू आंद्रे रसेलने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. रसेलने अवघी २ षटके टाकताना १५ धावा देत मुंबईच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रसेलने डावातील अखेरच्या षटकात ३ बळी मिळवले. यासह आयपीएलच्या इतिहासात दोन षटकांनंतर सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी असणाऱ्या गोलंदाजांमध्ये रसेल दुसऱ्या क्रमांकावर आला.

आयपीएलच्या इतिहासात दोन षटकांनंतर सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी असणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या स्थानी भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज व सध्या दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा ईशांत शर्मा आहे. ईशांतने २०११ आयपीएलवेळी डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना कोची टस्कर्स केरलाविरुद्ध पहिल्या दोन षटकात केवळ ६ धावा देऊन पाच गडी बाद केले होते. त्यानंतर आता रसेलने दोन षटकांत १५ धावा देऊन ५ गडी टिपण्याची कामगिरी करून दाखवली आहे.

या अनोख्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी सध्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा आहे. रोहितने २००९ आयपीएलवेळी डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच पहिल्या दोन षटकात हॅट्रिकसह चार बळी आपल्या नावे केले होते. यासाठी त्याने फक्त ६ धावा खर्चलेल्या. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने २०१३ आयपीएलवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळताना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पहिल्या दोन षटकात १७ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला.

रसेलच्या या दमदार व ऐतिहासिक कामगिरीनंतर ही केकेआरला विजय मिळविण्यात अपयश आले. गोलंदाजीत चमकलेला रसेल फलंदाजीत फ्लॉप ठरला आणि १५ चेंडूत केवळ ९ धावा काढून बाद झाला. केकेआरने आता स्पर्धेत दोन सामने खेळताना प्रत्येकी एक विजय व एक पराभव स्वीकारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

केकेआरविरुद्ध विजय मिळवला पण तब्बल २२५ सामन्यानंतर मुंबई इंडियन्सवर ओढवली ‘ही’ नामुष्की

चर्चा तर होणारच! गेंड्याच्या संवर्धानानंतर आता रोहित शर्मा केकेआरविरुद्ध ‘हा’ संदेश देणारी बुटं घालत उतरला मैदानात

सनरायझर्ससाठी खुशखबर! भुवी आणि विलियम्सनला मिळाले ‘हे’ मानाचे पुरस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---