आंद्रे रसेल हा त्याच्या गगनचुंबी षटकारांसाठी ओळखला जातो. हैदराबादविरुद्ध त्याचं हेच रुप क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं. रसेलनं आपल्या डावात 7 षटकार ठोकून हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. त्यानं अवघ्या 25 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या.
यासह आंद्रे रसेलनं आयपीएलमध्ये 200 षटकारही पूर्ण केले आहेत. हा मैलाचा दगड गाठताच त्यानं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. रसेल आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडू खेळून 200 षटकार ठोकणार फलंदाज बनला आहे. त्यानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला. या सामन्यात केकेआरनं हैदराबादवर 4 धावांनी विजय मिळवला. रसेलनं केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही आपली चुणूक दाखवली आणि सामन्यात 2 बळी घेतले.
आंद्रे रसेलनं आयपीएलमध्ये 200 षटकार पूर्ण केले. हे षटकार त्यानं 1322 चेंडू खेळून मारले. रसेल आता या आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडू खेळून 200 षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा विक्रम त्याच्याच देशाच्या ख्रिस गेलच्या नावे होता, ज्यानं 1811 चेंडूत 200 षटकार ठोकले होते. आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचाच किरॉन पोलार्ड आहे, ज्यानं 2055 चेंडूत 200 षटकार मारले आहेत. आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडू खेळून 200 षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज एमएस धोनी आहे, ज्यानं 3126 चेंडूंत हा पराक्रम केला.
आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडू खेळून 200 षटकार ठोकणारे फलंदाज
आंद्रे रसेल – 1322 चेंडू
ख्रिस गेल – 1811 चेंडू
किरॉन पोलार्ड – 2055 चेंडू
एबी डिव्हिलियर्स – 2790 चेंडू
एमएस धोनी – 3126 चेंडू
रोहित शर्मा – 3798 चेंडू
डेव्हिड वॉर्नर – 3879 चेंडू
यासह आंद्रे रसेल हा आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये 200 प्लसच्या स्ट्राईक रेटनं 1000 धावा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. रसेलच्या आधी एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी अशी चमत्कारिक कामगिरी केली होती. रसेलनं डेथ ओव्हर्समध्ये 200 प्लसच्या स्ट्राइक रेटनं 1013 धावा केल्या आहेत, तर एबीनं 1412 आणि कोहलीनं 1045 धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये 200+ स्ट्राइक रेटसह सर्वाधिक धावा
एबी डिव्हिलियर्स – 1421 धावा
विराट कोहली – 1045 धावा
आंद्रे रसेल – 1013 धावा
ऋषभ पंत – 534 धावा
फाफ डु प्लेसिस – 414 धावा
ख्रिस गेल – 404 धावा
महत्त्वाच्या बातम्या-
लिलावात विकल्या न गेलेल्या खेळाडूनं पदार्पणातच ठोकलं अर्धशतक! हैदराबादच्या गोलंदाजांची नाचक्की
KKR vs SRH । हर्षित राणा ठरला हिरो! शेवटच्या चेंडूवर केकेआरची हैदराबादवर मात
हंगामातील पहिल्याच सामन्यात आँद्रे रसेलचा महाविक्रम, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा सातवा खेळाडू