इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल याची बॅट चांगलीच तळपत आहे. रसेलने या स्पर्धेतील अठराव्या सामन्यात झंझावाती खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला आहे. गुरुवारी (१८ ऑगस्ट) सदर्न ब्रेव संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळताना रसेलने वादळी अर्धशतक केले आहे. त्याच्या या खेळीमुळे मँचेस्टर संघाने ६८ धावांनी विजय मिळवला आहे.
१०० चेंडूंच्या (The Hundred) या सामन्यात मँचेस्टर (Manchester Originals) संघाला आक्रमक सुरुवात मिळाली. कर्णधार जोस बटलरने सलामीला फलंदाजीला येत ४२ चेंडूत ६८ धावा फटकावल्या. तसेच फिलिप साल्टनेही ३८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मधळ्या फळीत रसेलने (Andre Russell) धुरा सांभाळली. त्याने अवघे २३ चेंडू खेळताना २७८.२६ च्या सरासरीने धावा काढल्या. ५ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ६४ धावांची खेळी केली. अर्थात त्याने फक्त बाउंड्रींच्या मदतीने ५४ धावा जोडल्या.
रसेलच्या या वादळापुढे सदर्न ब्रेवचे गोलंदाज फिके पडले. त्याच्या खेळीमुळे मँचेस्ट संघाने सदर्न ब्रेव संघाला १८९ धावांचे मोठे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सदर्न ब्रेव संघाचा घाम निघाला. त्यांचा संघ ८४ चेंडूतच १२० धावा करून सर्वबाद झाला. त्यांच्याकडून जॉर्ज गर्टन याने सर्वाधिक २५ धावा केल्या. तसेच रॉस व्हाईटले, सलामीवीर व यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक आणि कर्णधार जेम्स व्हिन्स यांनीही थोडेफार योगदान दिले. रॉसने २१ धावा, डी कॉकने २१ धावा व जेम्सने २० धावा जोडल्या. तर ५ फलंदाज एकेरी धावेवरच माघारी परतले.
या डावात रसेलने किफायतशीर गोलंदाजीही केली. त्याने ५ चेंडू टाकताना ७ धावा देत १ विकेट घेतली. घातक फलंदाज टीम डेव्हिडला त्याने १० धावांवर झेलबाद केले. अशाप्रकारे अष्टपैलू खेळ दाखवणाऱ्या रसेलला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुड्ढे में है दम! अँडरसनने वयाच्या चाळीसीत मोडला ११० वर्ष जूना विक्रम, नावे केला वर्ल्ड रेकॉर्ड
एकेवेळी १० पेग पिऊन शतक ठोकणारा कांबळी आता नोकरीसाठी दारुही सोडायला तयार
धडाकेबाज पुनरागमनानंतर चाहरसाठी टी२० विश्वचषकाची दारे खुली? गोलंदाज म्हणतोय, ‘माझी निवड…’