वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू आंद्रे रसेल याने आयपीएल २०२२ हंगाम खेळल्यानंतर स्वतःला एक खास भेट दिली आहे. यावर्षी त्याने आयपीएलमध्ये समाधानकारक प्रदर्शन केले आणि हंगाम संपल्यानंतर स्वतःसाठी एक महागडी गाडी खरेदी केली आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आंद्रे रसेल (Andre Russell) कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करत होता. संघासाठी त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये चांगले प्रदर्शन केले. हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये त्याने ३३५ धावा केल्या. त्याची सरासरी ३७.२२ होती, तर स्ट्राईक रेट १७४.४७ राहिला होता. यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना १७ विकेट्स घेतल्या होत्या. केकेआरने त्याला आयपीएल २०२२ पूर्वी मेगा लिलावात १२ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.
आयपीएल खेळण्यासाठी केकेआरने रसेलला दिलेल्या पैशांपैकी मोठा भाग त्याने ही महागडी गाडी खरेदी करण्यासाठी खर्च केल्याचे दिसत आहे. स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून रसेलने त्याच्या नवीन आणि महागड्या गाडीची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. गाडीसोबतचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत तो ‘मर्सिडीज, बेंज एएमजी जीटीआर’ या गाडीत बसलेला दिसत आहे. गाडीचा रंग हिरवा आहे, जो खूपच आकर्षक दिसत आहे.
आंद्रे रसेलने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी नेहमीच मोठे स्वप्न पाहतो. कठोर परिश्रम आणि त्यागामुळे तुमची स्वप्न पूर्ण होत असतात. ईश्वर खूप दयाळू आहे.” त्याच्या या खास पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांना त्याची ही नवीन गाडी खूपच आवडल्याचे दिसत आहे.
https://www.instagram.com/p/Cel5viDAmjZ/
रसेलने ही जी नवीन मर्सिडीज बेंज गाडी खरेदी केली आहे, तिची किंमत २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याने ही गाडी खरेदी केल्याची माहिती दिल्यानंतर त्यांचा वेस्ट इंडीज संघातील सहकारी ख्रिस गेल, डेरेन सॅमी, सुर्यकुमार यादव आणि इतर काही खेळाडूंनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
असं कुठं असतंय! अवघ्या २३ धावात ७ गड्यांना तंबूत धाडत ‘या’ संघाने जिंकला सामना, पाहा व्हिडिओ
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती
‘…म्हणून टी२० विश्वचषकासाठी उमरानला संघात घेऊ नका’,रवी शास्त्रींच्या विधानाने माजली खळबळ