---Advertisement---

केकेआरविरुद्ध विजय मिळवला पण तब्बल २२५ सामन्यानंतर मुंबई इंडियन्सवर ओढवली ‘ही’ नामुष्की

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 12:14 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी (१२ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) असा सामना खेळला गेला. मंगळवारी (१३ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) असा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने १० धावांनी विजय मिळवला आहे. या हंगामातील हा त्यांचा पहिलाच विजय आहे. असे असले तरी, या सामन्यात अष्टपैलू आंद्रे रसेलने केलेल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. याबरोबरच त्याने एक विक्रमही केला आहे.

रसेलचा मुंबईविरुद्ध पराक्रम
केकेआरचा प्रमुख अष्टपैलू आंद्रे रसेलने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. रसेलने अवघी २ षटके टाकताना १५ धावा देत मुंबईच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रसेलने डावातील अखेरच्या षटकात ३ बळी मिळवले. यासह तो मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज बनला. यापूर्वी, मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वोत्कृष्ट गोलंदाजी या हंगामातील पहिल्या सामन्यात हर्षल पटेलने केली होती. त्याने, ४ षटकात २७ धावा देत ५ गड्यांना तंबूत धाडले होते.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना अवघ्या ६ धावा देऊन ४ फलंदाज बाद केले होते. यामध्ये एका हॅट्रिकचा समावेश होता.

मुंबई विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पाच बळी
आंद्रे रसेल आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध पाच बळी मिळवणारा केवळ दुसराच फलंदाज बनला. याआधी ही कामगिरी हर्षल पटेलने मागच्याच सामन्यात केली होती. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत २२७ सामने खेळले आहेत. त्या अर्थाने, २२५ सामन्यात कोणताही गोलंदाज मुंबईचा पाच फलंदाजांना एका डावात बाद करू शकला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या –

चर्चा तर होणारच! गेंड्याच्या संवर्धानानंतर आता रोहित शर्मा केकेआरविरुद्ध ‘हा’ संदेश देणारी बुटं घालत उतरला मैदानात

KKR vs MI : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अखेरच्या षटकांत कमाल, मुंबईचा कोलकातावर १० धावांनी दणदणीत विजय

ब्रेकिंग! राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बेन स्टोक्स आय़पीएल २०२१ मधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---