मैदानावर घडलेल्या काही घटना या खेळाडूंना नेहमी लक्षात राहत असतात. कधी या घटना चांगल्या तर कधी वाईट आठवणी खेळाडूंच्या मनात राहतात. क्रिकेटच्या मैदानावर देखील अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आपल्या स्वप्नात येत असे, अशी कबुली असल्याचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने दिली होती. अशाच प्रकारची घटना आता वेस्ट इंडिजचा अष्टपैलू व आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स प्रतिनिधित्व करणारा आंद्रे रसेल याने दिली आहे. हा प्रसंग २०१८ आयपीएल दरम्यानचा असलेला त्याने सांगितले.
रसेलला सतावतात त्या आठवणी
आयपीएलमधील सर्वात विस्फोटक फलंदाज मानल्या जाणाऱ्या आंद्रे रसेलने एका क्रिकेट संकेतस्थळावर दिलेल्या मुलाखतीत बोलताना २०१८ आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातील एक प्रसंग सांगितला.
रसेल म्हणाला, “मी आयपीएल २०१८ मधील दुसऱ्या क्वालिफायरचा सामना कधीच विसरू शकणार नाही. मी राशिद खानच्या चेंडूवर बचावात्मक पवित्रा घेऊ शकलो असतो. मात्र मी तसे केले नाही व बाद झालो. बाद झाल्याने मी इतका निराश झालो होतो की, आतमध्ये जाताच कपडे न काढता शॉवरखाली उभा राहिलो. माझे बूट आणि कपडे ओले झाले. मी खेळपट्टीवर उभा राहिलो असतो तर सामना जिंकता आला असता.”
असा झाला होता सामना
आयपीएल २०१८ मध्ये कोलकाता व हैदराबाद हे दोन्ही संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात एकमेकांसमोर होते. १७५ धावांचा पाठलाग करताना कोलकाताने १० षटकात ९३ धावा बनविल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक व ख्रिस लिन लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. संघाला ३३ चेंडूत ५७ धावा हव्या असताना आंद्रे रसेल मैदानात उतरला होता. परंतु, तो सात चेंडूंमध्ये तीन धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर, हैदराबादने १४ धावांनी विजय संपादन केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बायको ती बायकोच! ‘या’ खेळाडूच्या पत्नीने चेहरा पाहून ओळखले तो आहे कोरोनाबाधित
योगा ते डम्बेल्स! भारतीय खेळाडू बायो बबल मध्ये ‘असा’ जपत आहेत फिटनेस
राहुल द्रविड ‘हा’ सल्ला नेहमीच द्यायचे, पृथ्वी शॉने दिला १९ वर्षांखालील संघातील जुन्या आठणींना उजाळा