आंद्रे रसेल हा टी-२० क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू मानला जातो. तुफानी फलंदाजीशिवाय तो वेगवान गोलंदाजीही करतो. मात्र तो वेस्ट इंडिज संघाकडून खेळत नाही. त्याच वेळी, तो जगभरातील लीगमध्ये सहभागी होत असतो. याबाबत वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी खेळाडूंवर ताशेरे ओढताना अलीकडेच सांगितले की, “त्यांनी आपल्या देशातील खेळाडूंना संघासाठी खेळण्याची विनंती करावी असे मला वाटत नाही. विंडीजचे बहुतेक क्रिकेटपटू फ्रँचायझी लीगमध्ये खेळत आहेत किंवा दुखापतग्रस्त आहेत.” यावर आता रसेलने प्रशिक्षकाला सडेतोड उत्तर दिले आहे.
ही बातमी शेअर करत आंद्रे रसेलने लिहिले की, “मला माहित होते की हे होईल, पण मी शांत बसणार आहे.” या मेसेजद्वारे त्यांनी संरागावलेला इमोजी देखील टाकला आहे. टी-२० विश्वचषकाला काही महिनेच उरले असतानाही वेस्ट इंडिज संघाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. रसेलशिवाय ऑफस्पिनर सुनील नरेनही राष्ट्रीय संघाबाहेर आहे, पण जगभरातील लीगमध्ये खेळत आहे. त्याच वेळी, एविन लुईस आणि ओशाने थॉमस फिटनेस चाचणीसाठी उपस्थित नाहीत.अशा परिस्थितीत प्रशिक्षकांचे हे विधान खेळाडूंना अधिक दूर लोटू शकते असे अनेकांचे मत आहे.
माजी क्रिकेटपटू फिल सिमन्स म्हणाले की, “यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही, पण तुम्ही काय करू शकता? मला वाटतं, जर तुम्हाला वेस्ट इंडिजकडून खेळायचं असेल तर तुम्ही स्वतःला उपलब्ध कराल.” अलीकडेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबतच करार सोडल्याची माहिती आहे. तो आता लीगमध्ये अधिक वेळ खेळताना दिसणार आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाचे सामने होणार आहेत. वेस्ट इंडिजने दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. पण गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत संघाची कामगिरी चांगली नव्हती. कायरन पोलार्डने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण तो लीगमध्ये खेळत आहे. त्यांच्या जागी निकोलस पूरनला आता संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांना आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते
एशिया कपमध्ये रोहित ठरणार ‘हिट’मॅन! एकाहून एक बड्या विक्रमांचे रचणार मनोरे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड






