न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू एलिसने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ३७ वर्षीय एलिसची १८ वर्षांची क्रिकेट कारकिर्द राहिली आहे. त्याने न्यूझीलंडकडून १५ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले आहेत. एलिसने कँटरबरीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले.
त्याने ३ फेब्रुवारी २०१२ झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याआधी तो जवळ जवळ १०वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे.
त्याने १०६ प्रथम श्रेणी सामन्यात ५२२१ धावा आणि २४९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने १३३ सामन्यात २७०८ धावा केल्या असून १५४ विकेट्स घेतल्या आहेत. तर ट्वेंटी-२० क्रिकेट प्रकारात त्याने १२७ सामन्यात १२५८ धावा आणि १३१ विकेट्स घेतल्या आहेत.
प्रथम श्रेणी, अ दर्जाचे सामने आणि ट्वेंटी २० अशा तीन प्रकारात १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा तो न्यूझीलंडचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. तसेच त्याला न्यूझीलंडकडून २०१४-१५ आणि २०१६-१७ चा सर्वोत्तम देशांतर्गत क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार दोनवेळा मिळवणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
विशेष म्हणजे एलिसला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधीच ५ वेळा कमरेच्या खालील भागातील स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीचा सामना करावा लागाल होता. अखेर २०१०मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
म्हणून एलिस गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना घालायचा हेल्मेट –
फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडमधील फोर्ड चषकात ऑकलंड आणि कँटरबरी या संघांमध्ये झालेल्या एका सामन्यात ऑकलंडकडून खेळणाऱ्या जीत रावलने १९ व्या षटकात चेंडू इतक्या जोरात मारला की तो गोलंदाजी करत असलेल्या एलिसच्या डोक्यावर लागून थेट सीमारेषेबाहेर गेला होता. त्यावेळी पंचांनी सुरुवातीला चौकार घोषित केल्यानंतर आपला निर्णय बदलत ऑकलंड संघाला सहा धावा बहाल केल्या.
त्यावेळी एलिसला मैदानाबाहेर जावे लागले होते. तसेच सर्व तपासण्या केल्यानंतर तो पुन्हा मैदानात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या घटनेनंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची असल्याने उपाय करण्यास सांगितले. त्यानंतर एलिस गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना हेल्मेट घालू लागला.
That is one tough nut. The stroke was recorded as 6, one bounce off Andrew Ellis's scone. Passed the concussion test & carried on….😬 #FordTrophy pic.twitter.com/2zsfLCI3qd
— #NZIII (@MargotButcher) February 20, 2018
ट्रेंडिग घडामोडी-
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
– आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
– सचिनचा पदार्पणाचा सामना भारतीयांना पहायला काय ऐकायलाही नाही…
– विराटने तेव्हा केलेला राडा ऑस्ट्रेलिया आजही विसरली नाही
– संंपुर्ण यादी: असा येतो बीसीसीआयच्या तिजोरीत पैसा