ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे सुरु होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियन संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. त्यांच्या संघात डेविड वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी पुकोव्हस्की चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
युवा २२ वर्षीय पुकोव्हस्कीला कसोटी मालिकेआधी भारताविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात खेळताना डोक्याला चेंडू लागला होता. याच कारणामुळे त्याला भारताविरुद्ध पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळता आले नाही. पण आता तो कन्कशनमधून(डोक्याला चेंडू लागल्यानंतर होणारा त्रास) पूर्णपणे सावरला असून तिसऱ्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे पुकोव्हस्कीला कन्कशनचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, याआधी त्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.
यबद्दल बोलताना मॅकडोनल्ड म्हणाले, ‘आम्हाला विलचा इतिहास महित आहे. मी व्हिक्टोरिया संघात त्याच्याबरोबर वेळ घालवला आहे. जेव्हा तो पुनरागमन करतो, तेव्हा त्याची कामगिरी चांगली असते.
सन २०१८ मध्ये पुकोव्हस्कीने २ वेळा कन्कशनचा सामना केल्यानंतर एक महिन्यातच त्याचे पहिले प्रथम श्रेणी शतक केले होते. तसेच मागील दोन वेळेस जेव्हा त्याने कन्कशननंतर पुनरागमन केले होते, तेव्हा त्याने द्विशतके केली होती.
मॅकडोनल्ड म्हणाले, ‘इतिहास हेच सांगतो की त्याने याआधीही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मला वाटते की निवडकर्ते त्याच्यावर विश्वास ठेवतील.’
पुकोव्हस्की गुरुवारी रात्री ऑस्ट्रेलियन संघात सामील झाला आहे. तसेच तो मेलबर्नमधून संघासह तिसऱ्या कसोटीसाठी सिडनीला रवाना होण्याआधी महत्त्वाच्या २ नेट सेशनमध्ये सहभागी होईल.
मॅकडोनल्ड यांनी म्हटले आहे की जर पुकोव्हस्कीला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली तर सिडनी कसोटीत मॅथ्यू वेडला मधल्या फळीत खेळवले जाऊ शकते आणि वॉर्नर आणि पुकोव्हस्की सलामीला फलंदाजी करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
साल २०२० मध्ये कसोटीत शतक करणारा ‘हा’ आहे एकमात्र भारतीय खेळाडू
…म्हणून आयसीसीला मागावी लागली बेन स्टोक्सची माफी
धोनीचा दशकातील सर्वोत्तम टी२० संघात समावेश कसा ? ‘या’ भारतीय क्रिकेटरने उपस्थित केला प्रश्न