इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या पुढच्या हंगामाचे वारे सध्या वाहू लागले आहेत. चाहते पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावाकडे नजरा लावून बसले आहेत. यावर्षीचा लिलावा छोट्या स्परूपाचा असला, तरी यामध्ये भारतीय आणि विदेशातील अनेक मोठे खेळाडू सहभागी होतील. यापैकीच एक आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन. लिलावात सर्व आयपीएल फ्रँचायझींसाठी ग्रीन महत्वाचा खेळाडू असणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या एका वक्तव्यामुळे सर्व फ्रँचायझींची चिंता वाढू शकते.
आयपीएल 2023 च्या लिलावात सर्व फ्रँचायझींच्या नजरा कॅमरुन ग्रीन (Cameron Green) याच्यावर असतील. मात्र, ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे ग्रीन आयपीएल खेळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्य प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया संघाचे आगामी वेळापत्रक खूपच व्यस्त आहे आणि याच कारणास्तव ग्रीनला आयपीएल खेळण्याआदी नक्कीच विचार करावा लागू शकतो. मॅकडोनाल्डच्या मते ग्रीन आयपीएलमध्ये खेळणार की नाही, याविषयी लीग जवळ आल्यानंतर ठरेल. तत्पूर्वी मागच्या महिन्यात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकापूर्वी ग्रीन ऑस्ट्रेलिया संघासोबत भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली होती. यापैकी दोन सामन्यांमध्ये ग्रीनने अर्धशतक केले होते.
भारत दौरा गाजवणाऱ्या 23 वर्षीय ग्रीनवर आयपीएलच्या पुढच्या हंगामात पैशाचा भडिमार होण्याची शक्यता आहे, पण तो आयपीएल खेळला, तर या गोष्टी शक्य आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मॅकडोनाल्ड म्हणाले की, “पुढच्या 12 महिन्यांमध्ये त्याचे (ग्रीन) एकूण वेळापत्रक हा चिंतेचा विषय आहे. मला वाटते हा प्रत्येक खेळाडूसाठी चिंतेचाच विषय आहे. आम्ही याविषयी अनेकदा चर्चा केली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी त्याला काय वाटते हे सध्या काल्पनिक आहे. आयपीएलच्या आधी त्याला खूप क्रिकेट खेळायचे आहे. आयपीएल सुरू होण्याआधी याविषयी निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, आयपीएल 2023 चे आयोजितन भारतातील बॉर्डर-गावस्कर (फेब्रुवारी-मार्च) आणि इंग्लंडमध्ये होणार्या ऍशेस (जुन-जुलै) मालिका यांच्या बरोबर मधल्या काळात केले गेले आहे. अशात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरकडून ग्रीन आधीच काही महत्वाच्या सुचना केल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार आणि दिग्गज वेगवान गोलंदाज याने संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळेच पुढच्या वर्षीच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. (Andrew McDonald expresses concern over Cameron Green’s workload ahead of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ स्वतः संघातून बाहेर पडला? बांगलादेशमधून आली धक्कादायक माहिती समोर
राष्ट्रीय संघाकडून सुट्टी मिळाली असताना सूर्यकुमार डॉमेस्टिकमध्ये करणार धमाका, एमसीए अधिकाऱ्याची माहिती