क्रिकेट जगतासाठी रविवार (१५ मे) हा एक काळा दिवस राहिला. रविवारी सकाळी उठल्याबोरबर ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू एंड्र्यू सायमंड्सचे निधन झाल्याची बातमी मिळाली. शनिवारी (१४ मे) रात्री त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि यामध्ये त्याने जीव गमावला. त्याच्या निधनानंतर जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली. अशातच आता त्याच्या बहिणीने लिहिलेली एक चिठ्ठी व्हायरल होत आहे. तिने एंड्र्यूसोबत अजून एकदा बोलण्याची संधी मिळायला हवी होती, असे या चिठ्ठीत लिहिले आहे.
एंड्र्सू सायमंड्स (Andrew symonds) याची बहीण लुईसने ज्या ठिकाणी सायमंड्सचा अपघात झाला, त्या ठिकाणाला भेट दिली आणि ही चिठ्ठी देखील त्याठिकाणी सोडली. तिने एंड्र्यूसाठी लिहिलेल्या या चिठ्ठीत एक खास संदेश लिहिला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार लुईसने या चिठ्ठीत लिहिले आहे की, “खूप लवकर सोडून गेलास. ईश्वराने तुझ्या आत्म्याला शांती द्यावी एंड्र्यू. आपल्याला एक दिवस अजून मिळाला असता, तर चांगले झाले असते. आपण अजून एकदा फोनवर बोलू शकलो असतो. माझे मन तुटले आहे. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करील.”
Floral tributes lay at the crash site where Andrew “Roy” Symonds lost his life on Saturday night, outside of Townsville.
The letter, penned by his sister, reads “I will always love you my brother” @TheTodayShow pic.twitter.com/Wt3EZGc6Ty— Mia Glover (@miaglover_9) May 15, 2022
दरम्यान, रविवारी माध्यमांमध्ये एंड्र्यू सायमंड्सच्या निधनाच्या बातम्या पाहिल्यानंतर क्रिकेट जगतातील जवळपास सर्व दिग्गजांनी त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण केली. एंड्र्यूच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी देखील अनेकांनी प्रार्थना केल्या आहेत. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास क्वींसलंडच्या टाउन्सहिल परिसरात सायमंड्सच्या गाडीचा अपघात झाला आणि यामध्ये त्याला जीव गमवावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमंड्सची गाडी रस्त्यावर पलटी झाली. अपघातानंतर त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला गेला, पण झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे जीव वाचवणे शक्य झाले नाही.
सायमंड्सच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने १९९८ साली ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००४ साली कसोटी क्रिकेटमध्ये, तर २००५ साली टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एकूण २६ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये १४६२ धावा केल्या, तसेच २४ विकेट्स देखील घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शतके आणि १० अर्धशतके आहेत.
संपूर्ण कारकिर्दीत त्याने १९८ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये ६ शतके आणि ३० अर्धशतकांच्या मदतीने ५०८८ धावा केल्या. तसेच १३३ विकेट्स देखील घेतल्या. टी-२० मध्ये त्याला १४ सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये ३३७ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ अर्धशतक निघाली, सोबतच ८ विकेट्स देखील घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तेव्हा मायदेशात भारताला धूळ चारण्यासाठी पाकिस्तानने बनवला होता ‘असा’ प्लॅन, तरीही झाले होते अपयशी
हिला डाला ना! ओडियन स्मिथ इतका जोरात शिंकला की, पंजाबचे खेळाडू धडाधड कोसळले, Video व्हायरल