---Advertisement---

व्हिएना ओपनचे विजेतेपद जिंकत रुबलेव्हने केला ‘हा’ मोठा पराक्रम

On: सोमवार, नोव्हेंबर 2, 2020 12:56 PM
---Advertisement---

रविवारी (१ नोव्हेंबर) व्हिएना ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्ह आणि इटलीचा लोरेन्झो सोनेगो यांच्यात झाला. या सामन्यात रुबलेव्हने लोरेन्झोला ६-४, ६-४ ने पराभूत केले. यासह त्याने एटीपीचे आपले पाचवे विजेतेपद जिंकले.

आठव्या क्रमांकाच्या रुबलेव्हने आपल्या शेवटच्या चारपैकी तीन स्पर्धेत विजय मिळवला. तसेच रविवारच्या विजयामुळे लंडनमधील एटीपी फायनल्समध्ये प्रवेश मिळविला.

रुबलेव्ह पाच विजेतेपद जिंकणारा या छोट्या हंगामातील पहिला खेळाडू ठरला. त्याने नोवाक जोकोविचला मागे टाकले आहे. म्हणजेच जोकोविचने या हंगामात आतापर्यंत चार विजेतेपद जिंकले आहेत. इतर कोणत्याही खेळाडूने दोनपेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या नाहीत.

सन २०१९ मध्ये अँटालियामध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर सोनेगो कारकिर्दीच्या दुसऱ्या अंतिम सामन्यात दिसला. यापूर्वी सोनेगोने शुक्रवारच्या उपांत्यपूर्व फेरीत नोवाक जोकोविचचा ६-२, ६-१ असा पराभव केला होता.

हा अंतिम सामना जिंकून रुबलेव्हने या हंगामातील आपल्या विजयाची संख्या ३९ वर नेली, तर त्याचे ७ पराभव झाले आहेत. याबरोबरच त्याने या हंगामातील जोकोविचच्या विजयांशी बरोबरी केली. इतर कोणत्याही खेळाडूने २८ पेक्षा जास्त सामने  जिंकलेले नाहीत.

वाचा-

-Vienna Open: अँडरसनने सेमीफायनलमधून माघार घेतल्याने रुबलेव्हची फायनलमध्ये धडक

-पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचची माघार

-भारतीय टेनिसपटू दिविज आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---