रविवारी (१ नोव्हेंबर) व्हिएना ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्ह आणि इटलीचा लोरेन्झो सोनेगो यांच्यात झाला. या सामन्यात रुबलेव्हने लोरेन्झोला ६-४, ६-४ ने पराभूत केले. यासह त्याने एटीपीचे आपले पाचवे विजेतेपद जिंकले.
हा अंतिम सामना जिंकून रुबलेव्हने या हंगामातील आपल्या विजयाची संख्या ३९ वर नेली, तर त्याचे ७ पराभव झाले आहेत. याबरोबरच त्याने या हंगामातील जोकोविचच्या विजयांशी बरोबरी केली. इतर कोणत्याही खेळाडूने २८ पेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत.
वाचा-
-Vienna Open: अँडरसनने सेमीफायनलमधून माघार घेतल्याने रुबलेव्हची फायनलमध्ये धडक
-पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचची माघार
-भारतीय टेनिसपटू दिविज आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर