---Advertisement---

लखनऊ संघाच्या प्रशिक्षकपदाची रेस अखेरीकडे? ‘हा’ दिग्गज आघाडीवर

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 9:01 AM
andy-flower
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पंधराव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. पूर्वाश्रमीच्या ८ संघांनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्याच वेळी आता या स्पर्धेमध्ये नव्याने दाखल झालेल्या लखनऊ आणि अहमदाबाद (Lucknow & Ahmedabad IPL Franchisee) या दोन संघांचे प्रत्येकी तीन खेळाडू लवकरच घोषित केले जातील. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडी फ्रॅंचायजी ठरलेल्या लखनऊ फ्रॅंचायझीने या आगामी हंगामाच्या तोंडावर आपले मुख्य प्रशिक्षक शोधणे सुरू केले असून, यामध्ये एका दिग्गज क्रिकेट प्रशिक्षकाचे नाव अव्वलस्थानी आहे.

ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या दोन नव्या संघांच्या  प्रवेश प्रक्रियेनंतर अहमदाबाद व लखनऊ हे संघ आगामी काळात आयपीएल खेळण्यासाठी पात्र ठरले. आरपीएसजी ग्रूपने ७०९० कोटी रुपये खर्च करत लखनऊ संघ खरेदी केला तर, सीव्हीसी कॅपिटलने ५१६६ कोटी रुपयांची बोली लावत अहमदाबाद संघ खरेदी केला आहे. सर्वात महागडा संघ ठरलेल्या लखनऊ संघाचे नेतृत्व व प्रशिक्षण कोण करणार? हा प्रश्न बर्‍याच दिवसांपासून विचारला जातोय. आता मात्र लवकरच या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळू शकते.

हा दिग्गज असू शकतो प्रशिक्षक
माध्यमांतील वृत्तानुसार, झिम्बाब्वेचे माजी खेळाडू ऍण्डी फ्लॉवर (Andy Flower) हे लखनऊ संघाचे प्रशिक्षक बनण्यात शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. ‌ ते मागील हंगामांत पंजाब किंग्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. फ्लॉवर हे आघाडीवर असले तरी, भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन (Gary Kirsten k) हेदेखील संघासोबत जोडले जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी (Daniel Vettori) व भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा(Ashish Nehra) हेदेखील या संघासोबत जोडले जाऊ शकतात. मात्र, कोणाकडे कोणती जबाबदारी असेल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

पहिल्या आठ संघांनी खेळाडू कायम केल्यानंतर आता अहमदाबाद व लखनऊ संघाला प्रत्येकी तीन खेळाडू निवडावे लागणार आहेत. यामध्ये दोन भारतीय व एका विदेशी खेळाडूचा समावेश असेल. या खेळाडूंच्या नावाचा खुलासा २५ डिसेंबर रोजी होऊ शकतो.त्यानंतर उर्वरित सर्व खेळाडू मेगा लिलावात जर उतरतील. हा लिलाव जानेवारी महिन्याच्या अखेरीस पार पडू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

ट्रोलर्सला मिळाले नवीन भांडवल! अजमल-मलिकच्या ‘तू पकड, मी पकड’ प्रसंगाची पुनरावृत्ती; पाहून व्हाल लोटपोट

टी२०तील एकाहून एक मातब्बर फलंदाजांना पुरून उरला पाकिस्तानचा रिझवान, केला ‘हा’ विश्वविक्रम

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---