इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने अँडी फ्लॉवर यांची साथ सोडली. अँडी फ्लॉवर लखनऊ सुपर जायंट्ससाठी मागच्या दोन्ही आयपीएल हंगामात मुख्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत होते. त्यांनी दोन्ही हंगामांमध्ये संघाला प्लेऑफसाठी पात्र केले. पण तरीही शुक्रवारी (14 जुलै) शंघाने त्यांना करारातून मुक्त केले.
लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांना दिलेल्या सेवेसाठी धन्यवाद म्हटले गेले. लखनऊच्या पोस्टमध्ये लिहिले की, “प्रिय अँडी, आज तुझा निरोप आहे. पण हा कधीच अखेरचा निरोप नसेल. कारण तू नेहमीच आमच्यापैकी एक असशील. संघासाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.”
आयपीएल 2021 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससोबत जोडले जाण्याआधी अँडी पंजाब किंग्ज संघाचा भाग होते. पंजाब किंग्जसाठी त्यांनी दोन आयपीएल हंगामात सहायक प्रशिक्षक म्हणून कामकाज पाहिले. 2021 मध्ये लखनऊसोबत जोडले गेल्यानंतर अँडीने आयपीएल 2022 आणि 2023 हंगामात संघाला सलग दोन वेळा तिसरे स्थान मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले.
झिम्बब्वे संघाचे माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज अँडी फ्लॉवर यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक राहिले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे 2021-23चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. अँडी या सामन्याच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियन संघाशी सोडले गेले होते. संघाला महत्वाचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना संघात घेतले गेल्याचे समोर आले होते. (Andy Flower has quit as the head coach of Lucknow Super Giants)
महत्वाच्या बातम्या –
अमेरिकेत सुपर किंग्सला मिळालेला पाठिंबा पाहून भावूक झाला प्लेसिस; म्हणाला, “हे आमचे कुटुंब…”
पुन्हा उडणार ‘टी20 चॅम्पियन्स लीग’चा धुरळा! ‘या’ देशांतील संघ भरणार रंग