क्रिकेटटॉप बातम्या

अमेरिकेत सुपर किंग्सला मिळालेला पाठिंबा पाहून भावूक झाला प्लेसिस; म्हणाला, “हे आमचे कुटुंब…”

अमेरिकेमध्ये मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला गुरुवारपासून (13 जुलै) सुरुवात झाली. हंगामातील पहिला सामना डेलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडिअम येथे टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात सुपर किंग्स संघाने नाईट रायडर्सला 69 धावांनी पराभूत करत हंगामात विजयी सुरुवात केली. या सामन्यानंतर बोलताना सुपर किंग्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली.

हंगामातील पहिलाच सामना चांगलाच एकतर्फी झाला. विजयी संघाचा कर्णधार असलेल्या फाफ डू प्लेसिसने या सामन्यासाठी उपस्थित राहिलेल्या आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले. तो म्हणाला,

“सुपर किंग्स हा एक मोठा परिवार आहे. ज्यावेळी आम्ही ही पिवळी जर्सी आणि सुपर किंग्स हे नाव घेऊन जातो त्यावेळी मोठा पाठिंबा मिळताना दिसतो. अमेरिकेत आमच्या संघाला इतका पाठिंबा मिळतो हे पाहून आनंद झाला.”

प्लेसिस यापूर्वी अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळला होता. मात्र, दोन वर्षांपासून तो आरसीबीचा भाग आहे. असे असले तरी चेन्नई सुपर किंग्सच्या मालकीचा जोहान्सबर्ग सुपर किंग्स हा संघ दक्षिण आफ्रिकेतील एसए टी20 लीगमध्ये खेळताना दिसतो. तसेच आता या स्पर्धेत देखील टेक्सास संघाची मालकी त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे नेतृत्व प्लेसिस करतो.

स्पर्धेतील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टेक्सास सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नाईट रायडर्स संघ 14 षटकात सर्व विकेट्स गमावत 112 धावाच करू शकला. आक्रमक अर्धशतक झळकावणारा सुपर किंग्सचा डेव्हिड मिलर सामनावीर ठरला.

(Faf Du Plessis Spokes On Super Kings Support In MLC In America)

महत्वाच्या बातम्या –
‘रोहित शर्मा फरारी आहे, पण तो…’, माजी दिग्गजाचे विधान वेधतंय क्रिकेटप्रेमींचं लक्ष
क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता

Related Articles