भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने भारताच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावाविषयी भाष्य केले. यावेळी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या पहिल्या डावात आक्रमकता दूर ठेवण्याचे आणि संयमी खेळी खेळल्याबद्दल रोहित शर्मा याचे कौतुक केले. यावेळी त्याने रोहितची तुलना फरारीसोबत करत मोठे भाष्य केले. चला तर, चोप्रा रोहितविषयी नेमका काय म्हणालाय हे जाणून घेऊयात…
काय म्हणाला आकाश चोप्रा?
आकाश चोप्रा (Aakash Chopra) त्याने युट्यूब चॅनेलवर बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नियंत्रित फलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला की, “रोहित शर्माची आणखी एक सुंदर कहाणी आहे. त्याने आपले 10वे कसोटी शतक ठोकले. जर तुम्हाला रोहित जे करत आहे, त्याची प्रशंसा करायची असेल किंवा समजायचे असेल, तर समजून जावा तुमच्याकडे एक फरारी कार आहे. ही कार ताशी 200 किमी वेगाने चालते. तसेच, तुम्हाला रस्ता चांगला नसूनही तिला ताशी 30 किमी वेगाने चालवण्यास सांगितले जाते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “ही कार तुम्ही क्रूझ कंट्रोलवर लावली नाही पाहिजे, तर एक्सीलेटरला तितक्याच वेगाने दाबले पाहिजे. सुरुवातीच्या 15-20 मिनिटांनंतर तुम्ही स्वत:ला रोखू शकणार नाहीत. रोहित काय करत आहे की, तो त्याच्या फरारी कारला ताशी 30 किमी वेगाने चालवतो. तरीही त्याला यामध्ये आनंद मिळत आहे.”
“सर्वात सुंदर गोष्ट अशी की, कसोटी क्रिकेट खेळण्याचा रोमान्स. रोहितचे हे सलामी रूप आपण इंग्लंडमध्ये पाहिले आहे. त्यानंतर सातत्याने पाहत आहोत. त्यावरून स्पष्ट आहे की, या खेळाडूला यामध्ये मजा येत आहे. तो रोहित शर्मा नाहीये. तो एक फरारी कार आहे, जी जेव्हा वाटेल तेव्हा कोणाविरुद्धही चौकार-षटकार मारेल. मात्र, या अंदाजात खेळणे दाखवून देते की, वाह काय बात आहे,” असे पुढे बोलताना तो म्हणाला.
रोहितची शतकी खेळी
गुरुवारी (दि. 13 जुलै) डॉमिनिकामध्ये खेळताना रोहित शर्मा याने 221 चेंडूत 103 धावांची खेळी साकारली होती. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 10 चौकारांचाही पाऊस पाडला. त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावत 312 धावा चोपल्या. यावेळी सलामीवीर यशस्वी जयसवाल नाबाद 143 आणि विराट कोहली नाबाद 36 धावांवर खेळत आहेत. तसेच, भारतीय संघाने पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेतली आहे. (cricketer aakash chopra lauds rohit sharma for his century against west indies in 1st test said this know here)
महत्वाच्या बातम्या-
VIDEO । 80 चेंडू खेळल्यानंतर विराटला चौकार मारण्यात यश, शतकाप्रमाणे केला जल्लोष
भारत-विंडीज मालिकेदरम्यान ICCने बदलला Slow Over Rate नियम, खेळाडूंच्या खिशावर पडणार फरक