---Advertisement---

‘या’ माजी क्रिकेटरचा पाकिस्तान संघाला धक्का, फेटाळला मुख्य प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 9:20 AM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक हे टी२० विश्वचषकानंतर त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर झिम्बाब्वेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एँडी फ्लावर याला पीसीबीने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारण्यासाठी विचारले होते. मात्र एँडी फ्लावरने पीसीबीच्या या प्रस्तावाला नकार दिला आहे. मिस्बाहच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तान संघाचा नुकत्याच जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-२ असा पराभव झाला होता

एँडी फ्लावरला प्रशिक्षकपदाचा चांगलाच अनुभव आहे. तो अनेक टी२० स्पर्धेंमधील संघांचा मुख्य प्रशिक्षक राहिला आहे. तो पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये मुल्तान सुल्तान संघांसाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतो. तसेच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) तो सेंट लूसिया किंग्ज संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. याव्यतिरिक्त तो अबू धाबी टी१० लीगमध्ये दिल्ली बुल्स संघाचाही मुख्य प्रशिक्षक आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या प्रस्तावाला नकार देत एँडी फ्लावरने म्हटले की, त्याला केवळ फ्रँचायजी क्रिकेटसह काम करायचे आहे. त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू इच्छित नाही.

असे म्हटले जात आहे की, सध्याचे पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हकचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चांगले संबंध नाहीत आणि पीसीबी त्यांच्याजागी कोणत्यातरी विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करणार आहे. असे असले तरीही, आगामी टी२० विश्वचषकासाठी संघाचे प्रशिक्षकपद मिस्बाहकडेच आसणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

एँडी फ्लावरने एका दशकापेक्षा जास्त काळ झिम्बाब्वे संघासोबत क्रिकेट खेळले आहे. त्याने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६३ कसोटी आणि २१३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांत एकूण ६७८६ धावा केल्या असून कसोटीमध्ये ५१.५५ च्या सरासरीने ४७९४ धावा केल्या आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण १६ शतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ओमानविरुद्ध जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी; मुंबईने ४ विकेट्सने जिंकला पहिला वनडे सामना

‘क्रिकेटचे द्रोणाचार्य’ वासू परांजपे काळाच्या पडद्याआड; गावसकर, तेंडुलकरसारख्या दिग्गजांना केले होते मोलाचे मार्गदर्शन

ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग ११

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---