श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघातील एकमेव कसोटी सामना कोलोंबो येथे सुरु आहे. अत्यंत चुरशीचा सुरु असलेला हा सामना आता चांगलाच चर्चेत आला आहे. ह्या चर्चेचे कारण आहे लंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज. अँजेलो मॅथ्यूजने या सामन्यात पहिल्या डावात 141 धावांची खेळी केलीये. अफगाणिस्तान गोलंदाजांची त्याने अक्षरशः पिसे काढली. परंतू, 141 धावांवर असतान मॅथ्यूजच्या हातून एक चूक घडली आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या ह्या चुकीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ( Angelo Mathews Gets Hit Wicket Out On Nothing Ball After Milestone Hundred Vs AFG Watch Video )
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटीत अफगाणिस्तानचा पहिला डाव 198 धावांवर आटोपला. तर श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद 439 असा धावांचा डोंगर उभारला. यात अँजेलो मॅथ्यूजचे योगदान सर्वोत्तम होते. मॅथ्यूजने 259 धावांचा सामना करत तब्बल 141 धावा कुठल्या. त्याच्या या खेळीने आणि चंडिमलच्या शतकाने लंकेने 439 धावा करत पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली. परंतू जेव्हा अँजेलो 141 धावांवर म्हणजे फुल फॉर्ममध्ये होता, तेव्हाच त्याच्याकडून चूक झाली आणि तो हिट विकेट झाला. त्याच्या ह्या हिटविकेट होण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो.
- अँजेलो मॅथ्यूज याचे असे सामान्यपणे आऊट होणे तसे काही नवीन नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊटमुळे चर्चेत आला होता. तेव्हा बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात उशिरा मैदानात आल्याने मॅथ्यूजला आपली विकेट गमवावी लागली होती. तेव्हा बराच वादंग झाला होता. आताही अफगाणिस्तानविरुद्ध फुल फॉर्मध्ये असताना मॅथ्यूज हिटविकेट सारख्या विचित्र पद्धतीने बाद झाला. त्यामुळे निराश होत त्याला जमिनीवर बसण्याची वेळ आली. कोलंबोत दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यासाठी अवघ्या 17 चेंडूचा खेळ बाकी होता आणि तेव्हा हा प्रकार घडला.
Qais to Angelo Mathews, OUt #srilankavsafghan #ining pic.twitter.com/ghx9E6EJPc
— Daniyal (@xaryanlix11) February 3, 2024
अँजोलो मॅथ्यूज स्ट्राईकवर असताना अफगाणिस्तानकडून कैश मोहम्मद गोलंदाजी करत होता. ओव्हरचा दुसरा चेंडू खेळपट्टीच्या एकदम बाहेर जात होता. त्यामुळे या संधीच्या फायदा घेण्यासाठी मॅथ्यूजने जोरदार प्रहार केला. चेंडू सीमारेषेवर जाऊन आदळला. पण हा चौकार काही त्याच्या वाट्यावर आला नाही, कारण बॅट घुमवताना त्याने ती थेट स्टंपवर टेकवली आणि तो 141 धावांवर हिटविकेट झाला. मॅथ्यूजच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे 16 वे शतक होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूला 7 वर्षांची जेल, चुकीच्या पद्धतीने लग्न केल्यामुळे शिक्षा
– अर्ध्यात कॉमेंट्री सोडून का गेले होते सुनिल गावसकर? खरं कारण आलं समोर, गावसकरांवर कोसळलाय दुःखाचा डोंगर । Sunil Gavaskar
– बे&%$ कोई भी गार्डन मे घुमेगा; मॉं &%$# सबकी, रोहित शर्माची शिवीगाळ कॅमेऱ्यात कैद