सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषकात श्रीलंका संघासाठी अनेक गोष्टी योग्य घडताना दिसत नाहीत. सलग तीन पराभवानंतर त्यांना आपला पहिला विजय मिळवता आला आहे. तर, नियमित कर्णधार दसुन शनाका हा दुखापतीमुळे स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर पडला आहे. त्यानंतर आता श्रीलंकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना हा देखील खांद्याच्या दुखापतीमुळे यापुढे स्पर्धेत दिसणार नाही. त्याच्या जागी अनुभवी अष्टपैलू व माजी कर्णधार ऍंजेलो मॅथ्यूज याचा संघात समावेश केला गेला आहे.
पहिल्या तीनही सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर पथिराना याला चौथ्या सामन्यातून वगळले गेले होते. त्यानंतर सराव सत्रात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो आता स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. सध्या संघासोबत राखीव खेळाडू म्हणून असलेल्या मॅथ्यूज याला संघात समाविष्ट केले गेले आहे. विशेष म्हणजे संघाचा तंदुरुस्त होऊन परतलेला प्रमुख वेगवान गोलंदाज दुश्मंता चमिरा हा अजूनही राखीव खेळाडूंमध्ये दिसेल.
(Angelo Mathews has replaced Matheesha Pathirana in Sri Lanka’s World Cup squad)
हेही वाचा-
गंभीरने खोलली पाकिस्तानची पोल; सांगून टाकल्या 3 सर्वात मोठ्या कमकुवत बाजू, लवकर सुधराव्या लागतील…
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…