क्रिकेटमध्ये ६ फूट ६ इंच इतकी उंची असलेला खेळाडू म्हणजे मॅचविनरच. अशा खेळाडूमुळे संघाला अधिकचा फायदा मिळतो हे सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट समीक्षक जाणतात. हिच उंची जर एका वेगवान गोलंदाजाला लाभली असेल, मग तर ‘सोने पे सुहागा.’ कर्टली अंब्रोस यांनी याच उंचीचा उपयोग करून भल्या-भल्या फलंदाजांना अक्षरशः आपल्यासमोर लोटांगण घालयला भाग पाडले. अशीच नैसर्गिक उंची लाभलेला एक वेगवान गोलंदाज इंग्लंड संघात होता. मात्र, या खेळाडूला कोणीही सभ्यतेची मर्यादा ओलांडताना पाहिले नाही. हा खेळाडू म्हणजे ‘ जेंटल जायंट ‘ या नावाने प्रसिद्ध असलेला अँगस फ्रेझर.
८ ऑगस्ट १९६५ ला जन्म झालेले अँगस यांना क्रिकेटमध्ये येण्यासाठी कोण्या बाहेरच्या व्यक्तीचा आदर्श घ्यावा लागला नाही. अँगस यांचे मोठे बंधू ऍलिस्टर हे इसेक्स व मिडलसेक्स या संघांसाठी प्रथमश्रेणी व लिस्ट ए क्रिकेट खेळत.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध १९८९ साली एजबॅस्टन कसोटीत शानदार कामगिरी करत त्यांनी क्रिकेटविश्वात आगमन केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२४ धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये, युवा फ्रेझर यांनी सर्वोत्तम गोलंदाजी करत ६३ भावात ४ बळी मिळवले होते. आपल्या प्रतिभेची ओळख याद्वारे त्यांनी सर्वांना करून दिली.
अँगस यांनी आपल्या कारकिर्दीत वेस्ट इंडीज संघाला कायम त्रस्त केले. वेस्ट इंडिज विरुद्ध १७ कसोटीत त्यांनी ७० बळी मिळवले. वेस्ट इंडीजमध्ये गेल्यावर तर ते अधिकच धोकादायक बनत. वेस्टइंडीजमध्ये खेळलेल्या १२ कसोटीत ५४ बळी त्यांच्या नावे जमा होते. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन ८-५३ व ८-७५ सुद्धा वेस्ट इंडिज विरुद्धच आले होते.
फ्रेझर यांना गोलंदाज असण्याचा एक तोटा असा होता की, त्यांना कधीही मोठे प्रायोजकत्वाचे करार मिळाले नाहीत. अल्प रक्कम स्वीकारण्याऐवजी प्रायोजकांशिवाय खेळण्यास त्यांनी कायम प्राधान्य दिले. ते नेहमी कोऱ्या बॅटने खेळत. सर्व प्रायोजकांचा निषेध करण्यासाठी त्यांनी आपल्या बॅटवर मागच्या बाजूला ” G’day, Richie ” असा संदेश लिहिला होता.
अँगस फ्रेझर यांनी १९८९ ते १९९९ या कालावधीत ४६ कसोटी व ४२ वनडे इंग्लंडसाठी खेळाताना, त्यात अनुक्रमे १७७ आणि ४७ बळी त्यांनी आपल्या नावे केले. या दरम्यान १९९६ च्या ‘विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर’ साठी त्यांची निवड झाली. १९९८ मध्ये, इंग्लंड क्रिकेटमधील योगदानासाठी राणी एलिझाबेथच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अँगस यांनी, ‘द इंडिपेंडेंट’ वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले. २०१४ मध्ये इंग्लड क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०१५ पासून ते मिडलसेक्स काउंटी क्लबचे व्यवस्थापक संचालक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला क्रिकेटमधील चोकर्स ठरतेय टीम इंडिया! दरवेळी मोक्याच्या क्षणी खातायेत कच
बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारत-पाकिस्तानच्या संघांतील ‘तो’ सामना रद्द
ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का