पुणे। डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत साखळी फेरीत ए अँड ए शार्क्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय मिळवला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात प्रसाद जाधव(1-17 व 27धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ए अँड ए शार्क्स संघाने आयकॉन टायगर्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला. तर, अभिषेक ताम्हाणे(नाबाद 42धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आयकॉन टायगर्स संघाने टीटी टायटन्स संघाचा 32धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
अन्य लढतीत चारुदत्त कुलकर्णी(नाबाद 24 व 1-8) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्नो लेपर्ड्स संघाने ऍक्वा रायडर्स संघाचा 5 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
निकाल: साखळी फेरी:
आयकॉन टायगर्स: 6षटकात 6बाद 60धावा(शंतनू शोरी 21(11,4×4), पराग चोपडा नाबाद 16(10), अभिषेक ताम्हाणे 13, नीरव शहा 1-8, प्रसाद जाधव 1-17)पराभूत वि.ए अँड ए शार्क्स: 4.3षटकात 2बाद 63धावा(नंदन कामत नाबाद 30(13,6×4), प्रसाद जाधव 27(12,2×4,2×6), गंधार मराठे 1-20);सामनावीर-प्रसाद जाधव; ए अँड ए शार्क्स संघ 6गडी राखून विजयी
आयकॉन टायगर्स: 6षटकात बिनबाद 66धावा(अभिषेक ताम्हाणे नाबाद 42(16,5×4,2×6), पराग चोपडा नाबाद 19(20,1×4,1×6)) वि.वि.टीटी टायटन्स: 6षटकात 5बाद 34धावा(मयूर जुन्नरकर 12, शंतनू शोरी 2-7,रोहित मेहेंदळे 1-7, अभिषेक ताम्हाणे 1-4);सामनावीर-अभिषेक ताम्हाणे; आयकॉन टायगर्स संघ 32धावांनी विजयी
स्नो लेपर्ड्स: 6षटकात 2बाद 58धावा(चारूदत्त कुलकर्णी नाबाद 24(14,2×4), नचिकेत जोशी 18, शार्दूल आंबेकर 1-8)वि.वि.ऍक्वा रायडर्स: 6षटकात 4बाद 53धावा(शैलेश बंगले 17, तेज दिक्षित 14, अजिंक्य मेहता 14, चारूदत्त कुलकर्णी 1-8);सामनावीर-चारूदत्त कुलकर्णी; स्नो लेपर्ड्स संघ 5धावांनी विजयी
ए अँड ए शार्क्स: 6षटकात 4बाद 61धावा(अंकुश जाधव 32(19,2×4,2×6), नंदन कामत 10, आशिष देसाई 2-6)वि.वि.मराठा वॉरियर्स: 6षटकात 5बाद 37धावा(नितीन हार्डीकर 17, नंदन कामत 3-3, आदित्य देशपांडे 1-6);सामनावीर-नंदन कामत; ए अँड ए शार्क्स संघ 24धावांनी विजयी.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये ‘या’ विक्रमांमध्ये ‘नंबर वन’ आहे डेव्हिड वॉर्नर, अन्य कोणी आसपासही नाहीत
कर्णधार मयंकने ‘या’ ३ सुधारणा केल्या तरंच बरं, नाहीतर पंजाब संघ होऊ शकतो प्लेऑफमधून बाहेर