भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान नुकताच टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) सामना पार पडला. भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केले. मागील विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला भारतीय संघाने यासोबत घेतला. भारताच्या या विजयात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारताचा माजी कर्णधार व दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी त्याचे कौतुक केले आहे.
अनिल कुंबळे हे भारत-पाकिस्तान सामन्यानंतर एका क्रिकेट संकेतस्थळाशी संवाद साधत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी अर्शदीप सिंगचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले,
“अर्शदीप निश्चितपणे परिपक्व झालाय. त्याने त्याची चांगली कामगिरी सुरू ठेवावी अशी माझी इच्छा आहे. झहीर खानने भारतासाठी जे काही केले ते करण्याची क्षमता अर्शदीपमध्ये दिसते. अर्शदीपने भारतासाठी चांगली कामगिरी करत रहावी, असे मला वाटते. मी त्यामुळे खरोखर प्रभावित झालो आहे. मी त्याच्यासोबत तीन वर्षे काम केले आहे. गेल्या आयपीएलमध्ये त्याने दाखवून दिले की तो दबाव कसा हाताळतो.”
आपला पहिलाच विश्वचषक खेळत असलेल्या अर्शदीपने विश्वचषक पदार्पण करताना आपल्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला पायचित केले. तर दुसऱ्या षटकात मोहम्मद रिझवान याला देखील त्याने तंबूचा रस्ता दाखवला. अखेरच्या षटकात पुन्हा एकदा तो भारतीय संघाच्या मदतीला धावून आला व त्याने आसिफ अली याला बाद केले. त्याने आपल्या चार षटकात केवळ 32 धावा दिल्या. अर्शदीप मागील तीन हंगामात पंजाब किंग्ससाठी चमकदार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघात निवडला गेला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
काय बोलायचं याला? अख्तर म्हणतोय, “आता विराटने टी20 मधून निवृत्त व्हावे”
मार्कसने कस के मारा! पाहा 18 चेंडूवर कशी केली षटकार-चौकारांची बरसात
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”