भारत आणि इंग्लंड यांच्यामधील तिसरा कसोटी सामना रोहित अँड कंपनीने चौथ्याच दिवशी खिशात घातला. टीम इंडियाने इंग्लंड संघाला 434 धावांनी पराभूत करत कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयामध्ये टीम इंडियाचा उभारता तारा असलेल्या यशस्वी जयस्वाल याने नाबाद 214 धावांची खेळी केली. या कसोटीमध्ये पहिल्या डावामध्ये 33-3 अशी संघाची अवस्था झाली होती. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्याच दिवशी विजय मिळवला आहे. तसेच यशस्वी द्विशतकानंतर अधिक चर्चेत आला आहे.
याबरोबरच सामना जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने द्विशतकवीर यशस्वी जैस्वालचे कौतुक केले असून त्याला एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जिओ सिनेमावर बोलताना भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यशस्वी जैस्वालला म्हणाला आहे की, ‘तू फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहेसच. मात्र माझ्या नजरेत एक गोष्ट आली आहे. मला वाटते की ती गोष्ट तू पुढेही करत रहावीस. तसेच तुझ्याकडे लेग स्पिन खेळण्याची अधिक क्षमता आहे.
यानंतर अनिल कुंबळे पुढे बोलताना म्हणाले आहेत की, ‘होय तुझ्याकडे लेग स्पिनरला हवी तशी अॅक्शन आहे. त्यामुळे मागे हटू नकोस कारण तुझी गोलंदाजी कधी उपयोगात येईल हे सांगता येत नाही. सध्या तुला पाठदुखीचा त्रास होत आहे. मात्र ज्यावेळी तू लेग स्पिनवर काम करशील त्यावेळी कर्णधार रोहित शर्माकडे तुला काही षटके गोलंदाजी द्यायला सांग.
दरम्यान, यशस्वी जैस्वाल पण फलंदाजीशिवाय तो गोलंदाजीतही चांगला फिरकी गोलंदाज बनू शकतो. तो चांगली लेगस्पिन गोलंदाजी करू शकतो. त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली आहे. यशस्वीने लिस्ट ए साठी एकूण 13 डावात त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, रोहित शर्माने अनिल कुंबळेचे म्हणणे मनावर घेतले तर पुढच्या सामन्यात यशस्वी गोलंदाजी करताना पाहायला मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या –






