आयपीएलमध्ये सर्वाधिक ३२६ षटकार, सर्वाधिक ६ शतके आणि १७५ धावा ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या असणारा खेळाडू म्हणजे, ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल होय. मात्र, हा विस्फोटक फलंदाज आयपीएलच्या तेराव्या हंगामात अद्याप तरी खेळताना दिसलेला नाही.
गेल यावर्षी आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सदस्य आहे. आतापर्यंत पंजाबने हंगामातील ६ सामने खेळले आहेत. त्यातील तब्बल ५ सामन्यात संघाच्या हाती पराभव आला आहे. तरीही स्टार खेळाडू गेलला अजूनही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. अशात सर्वांना प्रश्न पडला असेल की, का पंजाबने गेलला अद्यापही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही?.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल २०२०च्या २२व्या सामन्यापुर्वी पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफरने सांगितले होते की, “गेलला या सामन्यात संधी मिळेल. पण तो पूर्ण सामन्यात खेळताना न दिसल्यामुळे चाहते निराश झाले.”
त्यानंतर पंजाबचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने गेलला या सामन्यातही संधी न देण्यामागचे कारण सांगितले. कुंबळे म्हणाला की, “गेल हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळणार होता. पण गेल्या २ दिवसांपासून तो आजारी आहे. त्याला अन्न विषबाधा (फूड पॉइजनिंग) झाली आहे. त्यामुळे त्याला या सामन्यातही संघाबाहेर रहावे लागले.”
आयपीएलच्या या हंगामात आत्तापर्यंत सर्वाधिक ३१३ धावा करणारा पंजाबचा कर्णधार केएल राहुल चांगली कामगिरी करत आहे. पण तो बाद झाल्यानंतर संघाची फलंदाजी कमजोर होत आहे. तर दूसऱ्या बाजूला पंजाबचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालला सातत्याने चांगले फलंदाजी प्रदर्शन करता येत नाहीये. राजस्थान रॉयल्सविरुद्ध १०६ धावांची धमाकेदार खेळी केल्यानंतर पुढे त्याला मोठ्या धावा करता आल्या नाहीत. अशात गेलसारख्या आक्रमक फलंदाजाच्या येण्याने संघाची फलंदाजी फळी मजबूत होईल.
पंजाबने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते. पण शेवटी त्यांनी सुपर ओव्हरमध्ये तो सामना गमावला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दूसऱ्या सामन्यात त्यांनी ९७ धावांनी विजय मिळवला होता. पण पंजाबने पुढील सलग ४ सामने गमावले. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“‘या’ गोष्टीनंतर आमचा विजय अशक्य होता,” हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलचं वक्तव्य
किती ते दुर्दैव! ज्याच्यासाठी पंजाबने सर्वाधिक १० कोटी खर्च केले, ‘तोच’ आता ठरलाय सुपर डुपर फ्लॉप
…म्हणून केदारला जडेजा, ब्रोव्होच्या आधी फलंदाजीला पाठवले, चेन्नईच्या प्रशिक्षकांनी दिले स्पष्टीकरण
ट्रेंडिंग लेख-
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
हैदराबादने एकहाती जिंकला सामना; जाणून घ्या पंजाबच्या पराभवाची ५ कारणे






