---Advertisement---

अंकितने केलेलं ‘मूसेवाला’ सेलिब्रेशन भलतंच गाजतय, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जून 9, 2022 5:43 PM
Ankit-rajpoot-celebration
---Advertisement---

भारतात सध्या रणजी चषकाच्या बाद फेरीतील सामने सुरू आहेत. या बाद फेरीतील तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्याची लढत उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या दोन संघांमध्ये झाली. या सामन्यांत उत्तर प्रदेशच्या संघाने कर्नाटक संघाचा ५ गडी राखत पराभव केला आणि उपांत्य सामन्यांत धडक मारली. मात्र, या सामन्यात गोलंदाज अंकित राजपूतचे बळी घेतल्यानंतरचे सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

सामन्याच्या दुसऱ्या डावात १९ वे षटक टाकण्यासाठी अंकित राजपूतला बोलवण्यात आले. त्यावेळी षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्नाटकचा फलंदाज करुण नायर स्ट्राईकवर होता. याच चेंडूवर अंकितने करुणला रिंकू सिंगच्या हातात झेलबाद केले. त्यानंतर अंकितने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. थोड धावत जाऊन अंकित थांबला आणि त्याने दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला याच्या शैलीत मांडीवर हात आपटत आणि आकाशाकडे बघत सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. सध्या अंकितने केलेले हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यांत उत्तर प्रदेशने कर्नाटकाला पराभूत करत उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. यावेळी संघाचा कर्णधार संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. करण शर्माने दुसऱ्या डावांत शतकी खेळी करत उत्तर प्रदेशला विजय मिळवून दिला. आता उपांत्यपूर्व सामन्यांत विजय मिळवल्याने उत्तर प्रदेशचा संघ उपांत्य सामन्यांत दाखल झाला आहे. जिथे त्यांची लढत मुंबईच्या संघासोबत होणार आहे.

दरम्यान, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्याची हत्या त्याच्या मानसा गावात पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती आहे. यानंतर देश-विदेशातील त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. त्याच्या हत्येनंतर संपूर्ण क्रिडा विश्वातून त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. सध्या पोलीस त्याच्या हत्येचा तपास करत आहेत.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

शतक ठोकत बाबरने वेधले लक्ष्य, पण सामना संपल्यानंतर खऱ्या आर्थाने जिंकली चाहत्यांची मने, पाहा Video

‘…म्हणून त्यादिवशी विराट कोहली रडला होता,’ संघ सहकाऱ्याचे स्पष्टीकरण

उमरान की अर्शदीप, कोणाला द्यावी संधी?, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा पंतला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---