प्रतिभावान वेगवान गोलंदाज ‘अंकित राजपूत’ने (Ankit Rajpoot) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या 31 वर्षीय खेळाडूने सोमवारी (16 डिसेंबर) रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने क्रिकेट प्रवासातील चढ-उतारांचा उल्लेख केला आहे. याशिवाय त्याने प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंचेही आभार मानले आहेत.
आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्ज (CSK), पंजाब किंग्ज (PBKS), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि ‘राजस्थान रॉयल्स’कडून (RR) खेळलेल्या अंकितने अचानक निवृत्ती घेतली. पण त्याने आपल्या निवृत्तीचे कारण दिले नाही.
कानपूरच्या या गोलंदाजाने लिहिले की, “मी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. 2009-2024चा माझा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक काळ होता. मला मिळालेल्या संधींबद्दल मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, कानपूर क्रिकेट असोसिएशन, आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा आभारी आहे. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, विशेषत: फिजिओ डॉ. सैफ नक्वी, माझे प्रशिक्षक शशी सर आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार. माझे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात मला मदत केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.”
‘अंकित राजपूत’च्या (Ankit Rajpoot) क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 80 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 248 विकेट्स आहेत. त्याच वेळी 50 लिस्ट ए आणि 87 टी20 सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 71 आणि 105 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 29 सामन्यात अंकितने 24 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाची फलंदाजी फ्लाॅप ठरल्यानंतर, भडकला माजी खेळाडू! म्हणाला, “फलंदाजी प्रशिक्षक…”
IND vs AUS; मोहम्मद सिराजची ढाल बनला जसप्रीत बुमराह! म्हणाला…
‘पृथ्वी शाॅ’बद्दल स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “कोणीही त्याला बेबीसिट…”






