दक्षिण कोरियात सुरू असलेल्या इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. यावेळी त्याने १५० पैकी १४० गुण मिळवले असून असे करणारा तो पहिलाच भारतीय आहे.
स्लोवाकियाच्या हबर्ट ओलेजनीकने कांस्यपदक पटकावले असून त्याने दुसरा शॉट चुकवला. तर चीनच्या यिसांग यांगने रौप्यपदक मिळवले पण त्याचे आणि अंकुरचे गुण समान आहेत. मात्र त्याने चौथा शॉट चुकवला होता.
Bravo! India continues it's fabulous form at @ISSF_Shooting World Championships. #TOPSAthlete Ankur Mittal majestically shoots a GOLD in the Men's Double Trap Event following a shoot off involving 3 shooters. Congratulations to him on this brilliant achievement!👏🇮🇳#KheloIndia pic.twitter.com/bfoSBglR8F
— Col Rajyavardhan Rathore (Modi Ka Parivar) (@Ra_THORe) September 8, 2018
तसेच अंकुरने पुरूषाच्या संघात खेळताना मोहमद असब आणि शार्दुल विहानच्या साथीने कांस्यपदकही जिंकले आहे. यावेळी त्यांनी ४०९ गुण मिळवले होते. इटलीने ४११ गुण मिळवत सुवर्ण आणि चीनने ४१० गुण मिळवत रौप्य पदक जिंकले.
तसेच अंकुर हा विश्वचषकात सुवर्ण पदक मिळवणारा मानवजीत सिंग संधू,अभिनव बिंद्रा, संधू, तेजस्वीनी सावंत आणि ओम मिथरवाल यांच्या नंतरचा पाचवा भारतीय आहे.
या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताकडे २० पदके असून त्यात ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. यामुळे ते पदतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून चीन आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.
तसेच या स्पर्धेत खेळताना भारताने २०२०च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये दोन जागा निश्चित केल्या आहे. यात भारताच्या महिला नेमबाज अपूर्वी चंदेला आणि अंजुम मोदगील यांचा समावेश आहे. या दोघींनी महिलांच्या १० मीटर एयर रायफलमध्ये रौप्यपदक पटकावले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–युएस ओपन: नोवाक जोकोविचला दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी
–Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!