---Advertisement---

बीसीसीआयकडून 17 महिला क्रिकेटपटू करारबद्द, ‘या’ तिघींचा ‘अ’ श्रेणीत समावेश

On: गुरूवार, एप्रिल 27, 2023 1:03 PM
Indian Womens Team
---Advertisement---

गुरुवारी (27 एप्रिल) बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाचे वार्षिक करार घोषित केले. महिला संघाची कर्णधार हरमप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि त्याचसोबत अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना 2022-23 हंगामासाठी अ श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. एकूण 17 महिला खेळाडूंना राष्ट्रीय संघासोबत चालू हंगामासाठी करार मिळाला आहे.

अ श्रेणीमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांनी मागच्या वर्षी संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली असल्याने या तिघांनाही सर्वोत्तम करार मिळाला आहे. ब श्रेणीमध्ये रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड यांना निवडले गेले आहे. मेघना सिंग, देविका विद्या, सब्भीनेनी मेघना, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल आणि यास्तिका भाटिया यांना क श्रेणीमध्ये निवडले गेले आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1651479291522162690?s=20


(Annual contract of women’s cricket team announced by BCCI)
बातमी अपडेट होत आहे…

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिकने धोनीला म्हटले GOAT, तर आयपीएलचा सर्वात दुर्लक्षित खेळाडू म्हणून घेतले ‘या’ धुरंधराचे नाव
धोनीला विरोधी संघाकडूनही मिळतोय तुफान पाठिंबा; राजस्थानचा खेळाडू म्हणाला, ‘आता तो मैदानात असूनही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---