भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ मैदानात घाम गाळताना दिसून येत आहेत. ही मालिका दोन्हीही संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. परंतु या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लिश संघातील मुख्य फलंदाजाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इंग्लंड संघाचा फलंदाज ओली पोप हा टी-२० ब्लास्ट स्पर्धेत सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करतो. या स्पर्धेदरम्यान त्याला मांडीची दुखापत झाली होती, ज्यामधून तो अजुनपर्यंत पूर्णपणे बरा झाला नाही. त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर तो हा सामना खेळू शकला नाही; तर इंग्लंड संघाला मोठा धक्का बसू शकतो.
ओली पोपने डेली मेलसोबत बोलताना म्हटले की, “अजुनपर्यंत माझ्या पहिल्या कसोटीत खेळण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. मी चेंडू मारण्याचा प्रयत्न करत आहे. शक्य तितका धावण्याचा प्रयत्न करत आहे. मला अजूनही वेदना होत आहेत. परंतु ते महत्वाचं नाहीये.”
“मला आशा आहे माझ्या दुखापतीवर दुर्लक्ष करत मला खेळायची संधी दिली जाईल. फिजियो आणि संघ व्यवस्थापकांवर हा निर्णय अवलंबून असेल. मी हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे की, मी जर या कसोटी सामन्यात खेळलो; तर पुढील ४ कसोटी सामन्यात समस्या यायला नको,” असे ओली पोपने पुढे म्हटले.
इंग्लंड संघ जेव्हा भारतीय दौऱ्यावर आला होता, त्यावेळी कसोटी मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जॅक क्राॅली आणि डोम सिब्ले हे दोघेही साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे आगामी मालिकेत मध्यक्रमात खेळणारा फलंदाज ओली पोप डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. पोपने भारतीय संघाविरुद्ध ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने १८.८२ च्या सरासरीने २०७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने इंग्लंड संघासाठी १९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकासंह ८८२ धावा केल्या आहेत.(Another setback for joe root and team for 1st test vs india)
महत्त्वाच्या बातम्या-
प्लेइंग इलेव्हनबद्दल वसीम जाफरचा कोहली अन् शास्त्रींना ‘गुप्त संदेश’, पाहा तुम्हाला समजतोय का?
पुजारा इंग्लंडविरुद्ध करणार सलामीला फलंदाजी? उपकर्णधार रहाणेने दिले ‘हे’ उत्तर
‘नेक्स्ट स्टॉप इंग्लंड’! अखेर सूर्यकुमार अन् पृथ्वीने इंग्लंडसाठी भरली उड्डाण, फोटो केले शेअर