---Advertisement---

दिल्लीच्या पठ्ठ्याचे पहिल्याच सामन्यात सर्वात वेगवान ८ चेंडू; स्पीड पाहून तोंडून निघेल, तेज तर्रार..!

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 8:48 AM
---Advertisement---

बुधवारी (२२ सप्टेंबर) आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. अटीतटीच्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ गडी राखून विजय मिळवत, दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार प्रारंभ केला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. दरम्यान या संघातील वेगवान गोलंदाज एनरिच नोर्टजे याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

एनरिच नोर्टजे हा दिल्ली संघातील वेगवान गोलंदाज आहे. त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु आयपीएल २०२० स्पर्धेत त्याने वेगवान गोलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत त्याने १६ सामन्यात २२ गडी बाद केले होते. यादरम्यान त्याने काही वेगवान चेंडू देखील टाकले होते, जे पाहून फलंदाज आश्चर्यचकित झाले होते.

तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात एनरिच नोर्टजेने आपल्या घातक आणि वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यासह मोठ्या विक्रमाला देखील गवसणी घातली आहे. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वात जलद टॉप-८ चेंडू टाकण्याचा पराक्रम केला आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू 
१) १५१. ७१- एनरिच नोर्टजे
२) १५१.३७ – एनरिच नोर्टजे
३) १५०.८३ – एनरिच नोर्टजे
४) १५०.२१ – एनरिच नोर्टजे
५) १४९.९७ – एनरिच नोर्टजे
६) १४९.२९ – एनरिच नोर्टजे
७) १४९.१५ – एनरिच नोर्टजे
८) १४८.७६ – एनरिच नोर्टजे
९) १४८.७३ – कागिसो रबाडा
१०) १४८.४७- ख्रिस जॉर्डन

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फ्लॉप ठरला. सनरायझर्स हैदराबाद संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या डावात अब्दुल समदने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर राशिद खानने २२ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकअखेर ९ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून श्रेयस अय्यरने नाबाद ४७ आणि शिखर धवनने ४२ धावांचे योगदान दिले. हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ गडी राखून आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: पंत जिथे मनोरंजन तिथे! हवेत उडालेली रिषभची बॅट परत करताना विलियम्सनलाही आवरेना हसू

Video: विलियम्सनने पृथ्वी शॉचा घेतला भन्नाट कॅच, की गावसकरांना आठवला कपिल देवचा १९८३ वर्ल्डकपमधील झेल

Video: चेन्नईच्या फिरकीपटूने नेटमध्ये टाकला ‘इतका’ वेगवान चेंडू की, रायडू अन् ऋतुराजही झाले चकीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---