मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ४७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सोमवारी (२ मे) पार पडला. हा सामना कोलकाताने ७ विकेट्सने सहज जिंकला आणि हंगामातील चौथा विजय नोंदवला. पण, याच सामन्यादरम्यान कोलकाताचा युवा क्रिकेटपटू अनुकूल रॉयच्या बाबतीत एक अनोखी घटना घडली.
अनुकूल रॉय ऊप्स मोमेंटचा शिकार
झाले असे की या सामन्यात कोलकाताचा कर्णाधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानचा डाव सुरू असताना ८ व्या षटकात सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) अखेरच्या चेंडूवर पॅडल स्विप शॉट खेळला. यावेळी तो चेंडू वेगाने सीमारेषेजवळ जात होता. पण अनुकूल रॉयने (Anukul Roy) डाईव्ह घेतली आणि चेंडू सीमारेषेपार होण्यापासून रोखला.
पण यावेळी तो जेव्हा डाईव्ह मारत होता, तेव्हा त्याची ट्राऊझर खाली घसरली. असे असतानाही त्याने आधी चेंडू रोखला आणि खेळपट्टीच्या दिशेने अन्य संघसहकारी खेळाडूकडे फेकला. त्यामुळे ट्राऊझर घसरली असतानाही त्याने आधी चेंडू रोखत तो खेळपट्टीकडे झटकन फेकण्याला जास्त महत्त्व दिल्याने त्याचे कोलकाताच्या खेळाडूंनी कौतुकही केले. मात्र, या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले (Anukul Roy pulled down his trousers while saving a Four).
https://twitter.com/krishnaa_ti/status/1521139961575223296
तीन वर्षांनंतर अनुकूल खेळला आयपीएल
अनुकूल रॉयला कोलकाताने सोमवारी संधी दिली होती. त्यामुळे त्याचा हा आयपीएल कारकिर्दीतील दुसराच सामना होता. तो ३ वर्षांपूर्वी आयपीएलमधील पहिला सामना खेळला होता. त्याने २६ एप्रिल २०१९ साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केले होते. पण या सामन्यानंतर त्याला आयपीएल सामना खेळण्याची संधी गेले ३ वर्षे मिळाली नव्हती. अखेर तो सोमवारी कोलकाताकडून त्याचा दुसरा आयपीएल सामना खेळला.
कोलकाताने जिंकला सामना
या सामन्यात राजस्थानने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. बटलरने २२ धावांचे आणि शिमरॉन हेटमायरने २७ धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून टीम साऊदीने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक ४८ धावांची नाबाद खेळी केली. तसेच रिंकी सिंगने नाबाद ४२ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यरने ३४ धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकाताने १५३ धावांचे आव्हान १९.१ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
हेटमायरचा ‘या’ विक्रमात कार्तिक अन् धोनीलाही दणका; पटकावला थेट अव्वल क्रमांक