भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या रजेवर आहे. त्याने नुकत्याच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणाने माघार घेतली होती. तसेच त्याला इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या काही दिवस विश्रांती घेण्याृचे कारण लग्न असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
त्यातच त्याचे लग्न दक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनबरोबर होणार असल्याच्याही चर्चा जोरदार सुरु होत्या. अनुपमा सध्या गुजरातला गेल्याने या चर्चा अधिक रंगल्या. मात्र आता अनुमपाची आईने या सर्व अफवा असल्याचे म्हटले असून ती बुमराहबरोबर लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मनोरमा ऑनलाईनशी बोलताना अनुपमाच्या आईने सर्व चर्चांना पुर्णविराम देत या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.
मागील काही महिन्यांपासून बुमराह आणि अनुपमाच्या अफेअरच्या चर्चा
मागील काही महिन्यांपासून बुमराह आणि अनुपमा यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी बुमराहने तिच्या एका पोस्टवर कमेंट केल्याने त्यांच्यात अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
बुमराहला वनडेतूनही विश्रांती मिळण्याची शक्यता
बुमराहला १२ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेतून विश्रांती दिली आहे. तसेच त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यामध्ये २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या मालिकेतही बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बुमराह थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
दस्तुरखुद्द आनंद महिंद्रांनाही भुरळ पडलेल्या अक्षर पटेलच्या ‘त्या’ गाॅगलची किंमत नक्की आहे तरी किती?
अन् विराटने उंचावली ट्रॉफी! पाहा विजयानंतर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ
अक्षर पटेलच्या सनग्लासेसची आनंद महिंद्रा यांना भूरळ! म्हणाले, ‘त्यांचा ब्रँड काय आणि कुठे मिळतील?’