सध्या भारतीय कायद्यानुसार, अपराध असलेली सट्टेबाजी लवकरच कायदेशीर होण्याची शक्यता आहे. भारत सरकार क्रिकेटमधील सट्टेबाजीला कायदेशीर करण्याच्या विचारात असल्याचे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटले आहे. ठाकुर यांच्या या विधानाने सट्टेबाज आणि बेटींगचे शौकीन असलेल्या लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहेत.
सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा विचार सुरू आहे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष असलेल्या, ठाकूर यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीज फायनान्शियल कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हटले, “सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा प्रस्ताव आम्हाला तुम्हा लोकांमार्फत आला आहे. सट्टेबाजी अनेक देशांमध्ये कायदेशीर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या मोठ्या देशातही याला मान्यता आहे. सट्टेबाजीतून देशाला हजारो कोटींचा महसूल मिळू शकेल. हा महसूलरूपी मिळणारा पैसा क्रीडा आणि इतर क्षेत्रांवर खर्च केला जाऊ शकतो.”
मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी होऊ शकतो फायदा
ठाकुर आपले म्हणणे पुढे नेताना म्हणाले, “सट्टेबाजीमुळे मॅच फिक्सिंगसारख्या प्रकरणांचा छडा लावला जाऊ शकतो. सट्टेबाजी कायदेशीर करणे, फिक्सिंगला आळा घालण्यासाठी उपयोगी ठरेल. आपल्याला या सर्व गोष्टींवर विचार करावा लागेल. फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा फायदा होईल.”
क्रिकेट खेळणाऱ्या पाच देशात अधिकृत आहे सट्टेबाजी
क्रिकेट खेळणाऱ्या पाच प्रमुख देशांमध्ये सट्टेबाजी कायदेशीर आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचा समावेश होतो. भारतात ड्रीम ११ सारख्या संकेतस्थळांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीनचिट दिली आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते, मोबाईल गेमिंग हा सट्टा नाही. यात डोक्याची हुशारी वापरावी लागते. सट्टेबाजीमध्ये तसे नसते. सट्टेबाजी व गेमिंग यात लहानशी रेघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलने स्वीकारावी चुकीच्या संघनिवडीची जबाबदारी; माजी दिग्गजाचे रोखठोक मत
डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी