---Advertisement---

अनुष्काने शेअर केलेल्या फोटोवर पती विराटने केली हृदयस्पर्शी कमेंट

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 5:42 PM
---Advertisement---

अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या घरी एक लहान पाहुणा येण्याची चांगली बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या आवडत्या खेळाडूच्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाबद्दल चाहतेही खूप आनंदित आहेत. अनुष्का सध्या तिच्या प्रेग्नन्सीचा आनंद घेत आहे. अनुष्का सोशल मीडियावर पती विराट कोहलीबरोबर, तर कधी एकटीचाच फोटो शेअर करताना दिसत असते.

अनुष्काने रविवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या बेबी बंपशी फ्लांट करताना दिसत आहे. त्याचबरोबर अनुष्काच्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर कर्णधार विराटने अशी कमेंट केली आहे की, जी पाहून कोणाचंही मन जिंकेल.

विराट कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीगसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे. जेथे तो आपला संघ आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे, तर अनुष्का सध्या भारतात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बेबी बंपचा एक फोटो शेअर केला आहे. यासह त्यांनी लिहिले, “जेव्हा तुमच्यात एक नवीन जीवन जन्म घेण्यास तयार होतो, तेव्हा जगात यापेक्षा जास्त सत्य काहीच दिसत नाही, जे आपल्या नियंत्रणात नाही, तर सत्य काय आहे?”

विशेष म्हणजे, अनुष्काच्या या पोस्टला खूप प्रेम मिळत आहे, तर विराट कोहलीनेही पत्नी अनुष्काच्या या पोस्टवर हृदयस्पर्शी कमेंट केली आहे. त्याने लिहले की, “माझे संपूर्ण जग या एकाच चौकटीत व्यापलेले आहे.”

https://www.instagram.com/p/CFEu4R_J7Oi/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या महिन्यातच विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या घरात नवीन पाहुणा येण्याची माहिती दिली होती. जानेवारी २०२१ मध्ये ते पालक होणार आहेत. दरम्यान, विराट कोहलीला तुम्ही जानेवारीत वडील बनणार आहे. तेव्हा तुम्हाला कसे वाटते, असे विचारले असता. यावर उत्तर देताना कोहली म्हणाला की ही अशी एक भावना आहे, ज्यावर आपला विश्वास नसतो. आम्हाला कसं फील होत आहे, याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पराक्रम केलाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने, आनंद झाला युएईमध्ये असलेल्या विराट कोहलीला

-क्रिकेटच्या खेळपट्टीवर चक्क डान्स करताना दिसला विराट कोहली; पहा व्हिडिओ

-शतक ठोकलेला फलंदाज म्हणतो, मी कितीही धावा केल्या, तरी मला संघात स्थान मिळू शकत नाही

ट्रेंडिंग लेख-

-सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू आयपीएलमध्येही धमाका करण्यास सज्ज

-यंदाचा आयपीएल हंगाम गाजवू शकतात हे ५ दिग्गज सलामीवीर

-बीडमधील आंबेजोगाईचा भीडू आयपीएल गाजवायला झालाय सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---