Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनुष्काने घेतली फिरकी, फोटो पाहून तुम्हीही हसाल

विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनुष्काने घेतली फिरकी, फोटो पाहून तुम्हीही हसाल

November 5, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-Anushka-Kohli

Photo Courtesy: Instagram/@AnushkaSharma


भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली 34 वर्षांचा झाला आहे. शनिवारी (5 नोव्हेंबर) विराटने ऑस्ट्रेलियात त्याचा वाढदिवस साजरा केला. भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि विराट या स्पर्धेत संघासाठी सर्वात महत्वाचा फलंदाज ठरला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने विराटच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली, ज्यामध्ये आपण विराटला मजेशीर पोज देताना पाहू शकतो.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने एकूण चार फोटो शेअर केले आहेत. त्यांची मुलगी वामिका देखील एका फोटोत दिसते. अनुष्काने शनिवारी स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून ही पोस्ट शेअर करताना दिले की, “आज तुझा वाढदिवस आहे माय लव्ह. मी या पोस्टमध्ये तुझे सर्वोत भारी फोटो घेतले आहेत. मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्यावर प्रेम करेल.” अनुष्काने शेअर केलेल्या हे फोटो अगदीच मजेशीर आहेत. एका फोटोत त्यांची मुलगी वामिका देखील दिसत आहे. परंतु, अनुष्काने तिच्या चेहऱ्यावर हर्टचे इमोजी लावले आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्समध्ये शुभेच्छा देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराट कोहलीची मोठी बहीण भावना कोहली () हिने देखील सोशल मीडिया पोस्ट करत विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावना कोहलीने लिहिले की, “लोकांसाठी तू एक दिग्गज आहे. पण माझ्यासाठी तू लहान मुलगाच आहेत, जो लहानपणापासून सर्वांचा लाडका आणि गोड आहे. मोठा झाल्यानंतर मी या मजबूद व्यक्तिमत्वाला खूप मेहनत, शिस्त आणि उत्सुकतेहस पाहिले आहे. तो एक असा व्यक्ती देखील आहे, जो नाते सांभाळण्यामध्ये खूप चांगले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विराट. ईश्वर तुला आयुष्यात सुख आणि समृद्धी देवो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhawna Kohli Dhingra (@bhawna_kohli_dhingra)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अजिबात कारण देऊन चालणार नाही’, फेक फिल्डिंगवर बांगलादेशचा सल्लागार संतापला
भारताचा माजी कर्णधार विराट १८ नंबरची जर्सी का घालतो? कारण आहे खूपच भावूक  

 


Next Post
Rishabh-Pant

टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर पाँटिंगचा सवाल; म्हणाला, 'पंतला...'

MS-Dhoni-Upset

धोनीला का चढावी लागलीये कोर्टाची पायरी? वाचा संपूर्ण प्रकरण

Virat-Kohli

व्हिडिओ: भारतीय खेळाडूंनी साजरा केला दोघांचा वाढदिवस, विराटशिवाय दुसऱ्या व्यक्ती कोण?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143