---Advertisement---

पतीच्या प्रत्येक निर्णयाचा आदर! कोहलीच्या कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयावर पत्नी अनुष्काची ‘हृदय जिंकणारी’ प्रतिक्रिया

On: शुक्रवार, सप्टेंबर 17, 2021 11:29 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याने नुकतीच टी२० संघाच्या नेतृत्त्वाच्या जबाबदारीचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे. आगामी टी२० विश्वचषक २०२१ नंतर तो हे पद सोडणार आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन अचानक या निर्णयाची घोषणा केल्यानंतर बहुंताश जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहींनी त्याच्या या निर्णयास योग्य असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेसुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कसोटी, वनडे आणि टी२० मध्ये भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळणारा कोहली आपल्यावरील कामाचे ओझे कमी करण्यासाठी या निर्णयापर्यंत पोहोचला आहे. त्याला आपला बिघडलेला फलंदाजी फॉर्मही सुधारायचा आहे. त्यामुळे टी२० विश्वचषकानंतर टी२० या स्वरुपातील संघाची नेतृत्वाची कमान सोडत वनडे आणि कसोटीवर अधिक भर देणार असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या या मोठ्या निर्णयावर क्रिकेटविश्वातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://www.instagram.com/p/CT4eJCGFX_m/?utm_source=ig_web_button_share_sheet

त्याची पत्नी अनुष्कानेही यावर रिऍक्ट केले आहे. ती तिच्या पत्नीच्या या निर्णयाचे समर्थन करत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विराटची कर्णधारपदावरुन हटणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. यावर तिने हृदयाचा इमोजी शेअर करत त्याच्या निर्णयास आपला पाठिंबा दर्शवला आहे.

विराटने टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडावे, असी कुणकुण फार पूर्वीपासून चालू होती. परंतु आता त्याने स्वत: अधिकृतपणे घोषणा करत या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. यानंतर मात्र टी२० संघाचा भावी कर्णधार कोण असेल?, हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. बऱ्याचशा क्रिकेट जाणकारांनी याबाबत मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे नाव घेतले आहे. त्याच्यापाठोपाठ रिषभ पंत, केएल राहुल यांचीही नावे शर्यतीत आघाडीवर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---