---Advertisement---

पहा व्हिडीओ- विराट कोहलीने घेतलेला झेल पाहून अनुष्का शर्मा थक्क

On: सोमवार, एप्रिल 30, 2018 4:07 PM
---Advertisement---

काल पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकता नाईट रायडर्स सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची फक्त उत्तम फलंदाजीच नाही तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पहायला मिळाले. 

पण तरीही बेंगलोरला कोलकता विरूद्ध 6 विकेट्सने पराभव स्विकीरावा लागला. विराटने या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. यामुळे बेंगलोरला 175 धावांचा टप्पा पार करता आला. 

परंतू अखेरच्या काही षटकात बेंगलोरच्या गोलंदाजीतील कमतरतेमुळे कोलकताने हे आव्हान सहज पार केले.

कोलकता 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 19 षटकाच्या 5 व्या चेंडूवर कर्णधार दिनेश कार्तिकने लाँग आॅनच्या दिशेने मोठा फटका मारला. पण हा उंच गेलेला चेंडू विराटने धावत जाऊन पकडला. 

ज्यामुळे कार्तिक कोलकताला 5 धावांची गरज असताना बाद झाला. विराटने पकडलेल्या या झेलाचे सर्वांनी कौतुक केले. पण विराटला खास दाद मिळाली ती त्याची पत्नी अनुष्का शर्माकडून. हा सामना पहाण्यासाठी अनुष्काही उपस्थित होती. 

विराटने झेल घेतल्यानंतर त्याला दाद देणारे तिचे चेहऱ्यावरील भाव सध्या सोशल मिडियावर चांगलेच वायरल होल आहेत.

विराटचा बेंगलोर संघ सध्या आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. ते गुणतालिकेत 7 सामन्यात 2 विजयांसह सातव्या क्रमांकावर आहेत. 

https://www.instagram.com/p/BiLnfsKB_cm/?taken-by=viranushka_

महत्त्वाच्या बातम्या –

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

Video: एमएस धोनी म्हणतो, झिवा माझ्यापेक्षा चांगला डान्स करते

चेन्नई सुपर किंग्जचा हा खेळाडू दोन आठवड्यांसाठी आयपीएलला मुकणार

– राफेल नदालने क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा करत रचला मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या या शहरातून मिळाले ३ विश्वचषक विजेते खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment