नुकताच भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या तो कोणत्याच तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधार नाहीये. परंतु सध्या त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेटमध्ये क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. अनुष्का वेगवान गोलंदाजीचा भरपूर सराव करत आहे. आपल्या सरावाचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा सराव करतानाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आणि फोटोमध्ये ती हातात लाल चेंडू घेऊन सराव करताना दिसत आहे. त्याचवेळी तिचा पती विराट सध्या रजेवर आहे. बीसीसीआयने विराटला बायो बबलमधून १० दिवसांसाठी विश्रांती दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत कोहली भारतीय संघाचा भाग नाही. अनुष्का तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी सराव करत आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघातील महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्यावर आधारित आहे. झुलनने तिच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले असून भारतातील महिला क्रिकेटला झुलनने मोठे योगदान दिले आहे.
https://www.instagram.com/p/CaY30hKJCAk/
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या वर्षी आई-वडील झाले आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे नाव वामिका (Vamika) ठेवले आहे. आई झाल्यानंतर अनुष्का काही काळ चित्रपटांपासून लांब होती. आता या सिनेमाद्वारे ती पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीत पुनरागमन कटणार आहे. तिचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यासाठी अनुष्का जवळपास महिनाभर इंग्लंडमध्ये शूटिंग करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती क्लीन स्लेट प्रॉडक्शन हाऊस करत आहे.
यापूर्वी भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंवर चित्रपट बनले आहेत. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर चित्रपट बनवण्यात आला. बॉक्सर मेरी कोम, मिल्खा सिंग यांच्यावर सुद्धा चित्रपट बनवण्यात आले आहेत. नुकताच १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघावर ‘८३’ हा चित्रपटही बनवण्यात आला होता. या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोणसह अनेक दिग्गज कलाकार होते. या चित्रपटात १९८३ च्या विश्वचषक संघाचा संघर्षमय प्रवास दाखवण्यात आला होता. खेळाडूंवर बनवलेले चित्रपट अनेकदा बॉक्स ऑफिसवर विशेष काही कामगिरी करत नाहीत. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ व्यतिरिक्त ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कॉम’ आणि ‘८३’ सारख्या चित्रपटांनी अपेक्षेइतकी कमाई केली नाही.
https://www.instagram.com/p/CYX7vaDFcDZ/?utm_source=ig_embed&ig_rid=1face5ee-0283-401a-95df-18303e43382a
अनुष्काने याआधीही या चित्रपटाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. झुलन गोस्वामी यांच्यावर आधारित हा चित्रपट त्यांच्या आयुष्याबद्दल आणि कारकिर्दीबद्दल सांगणार आहे. झुलन ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. आतापर्यंत तिने २४० विकेट्स घेतल्या आहेत. झुलन या विश्वचषकात २५० बळींचा टप्पा गाठू शकते. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा
‘या’ राज्यात सुरू होतेय देशातील पहिलीच महिला क्रिकेट अकादमी, विनाशुल्क पुरवल्या जातील सुविधा