---Advertisement---

‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 3:00 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक सध्या खूप व्यस्त आहे. नुकत्याच भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या आहेत. त्यानंतर आता २४ फेब्रुवारीपासून त्यांना श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानांवर टी२० आणि कसोटी मालिका (Test Series) खेळायच्या आहेत. तत्पूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला १० दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी२० सामन्यात अनुपस्थित होता. तर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेतही तो खेळणार नाही.

त्यामुळे विश्रांतीवर असलेला विराट सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. नुकताच तो एका वेगळ्या लूकमध्ये दिसला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या नव्या लूकची खूप चर्चा आहे.

सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीचा नवा फोटो (Virat Kohli New Look) व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये तो पंजाबी लोकांप्रमाणे डोक्यावर (Virat Kohli In Blue Turben) निळी पगडी बांधलेला (Virat Kohli Punjabi Look) दिसतो आहे. तसेच त्याने फॉर्मल कपडेही परिधान केले आहेत. त्याच्याबरोबर सेटवर त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही दिसली आहे. तिनेही पंजाबी लूक केला आहे. क्रिकेटजगतातील या प्रसिद्ध जोडीला अशा नव्या लूकमध्ये पाहून चाहत्यांना असंख्य प्रश्न पडू लागले आहेत. त्यांच्या या नव्या लूकमागचे कारण काय असावे? याबाबत चाहते वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. 

https://www.instagram.com/p/CaT78dBKngQ/?utm_source=ig_web_copy_link

एकत्र जाहिरातीत झळकणार आहेत विरुष्का!
असे म्हटले जात आहे की, विरुष्काची जोडी लवकरच एकत्र एका जाहिरातीत दिसणार आहे. काहींनी तर असाही अंदाज लावला आहे की, ते दोघे सोबत कोणता चित्रपट तर करणार नाहीत ना?. असे असले तरीही अद्याप त्यांच्या या नव्या लूकमागचे खरे कारण पुढे आलेले नाही.

https://twitter.com/mani_07dec/status/1496748937054601216?s=20&t=KucSN45lBhhf76qb43M0EQ

विराट श्रीलंकेविरुद्ध करणार पुनरागमन
विराट सध्या क्रिकेटपासून विश्रांतीवर असून तो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन करेल. या मालिकेत २ सामने खेळले जाणार असून पहिला सामना ४ ते ८ मार्च दरम्यान मोहाली येथे होणार आहे. त्यानंतर १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरू येथे दुसरा कसोटी सामना होईल. हे दोन्हीही सामने आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत खेळवले जातील. त्यामुळे ही मालिका जिंकत गुणतालिकेतील आपली स्थिती मजबूत बनवण्याकडे भारतीय संघाचा कल असेल. या मालिकेपासून रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

नवी इनिंग! ज्या दिल्लीकडून खेळला शेवटचा आयपीएल सामना, त्याच दिल्लीत आगरकरांचे पुनरागमन

चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’

संजू सॅमसनची टी-२० विश्वचषकासाठी निवड निश्चित? कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतोय पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---