भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली काही दिवसांपूर्संवी संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. दौरा संपल्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला, पण विराट त्याच्या कुटुंबासोबत त्याठिकाणी सुट्ट्यांचा एंन्जॉय करण्यासाठी थांबला होता. विराट आणि अनुष्का शर्माने लंडनमध्ये सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेतला असून आता ते भारतात परतले आहेत. दोघांना नुकतेच विमानतळावर पाहिले गेले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मागच्या मोठ्या काळापासून सोबत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. ही जोडी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठीही जात असतात. अशात आता इंग्लडमधील शुट्टी संपल्यानंतर जेव्हा ही जोडी मायदेशात परतली, तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओची चर्चा होण्याचे प्रमुख कारण ठरली अनुष्का शर्मा.
https://www.instagram.com/reel/Cgu-eRJhNXH/?utm_source=ig_web_copy_link
विराट आणि अनुष्काचा हा व्हिडिओ एक फॅन पेज व्हायरल भयनी या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, दोघेही एकमांकडे लक्ष देत आहेत. यादरम्यान, अनुष्का खाली पडता-पडता वाचली. याच कारणास्तव काही नेटकरी अनुष्काने ड्रिंक केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे आणि त्यावर येणाऱ्या कमेंट्सही पाहण्यासारख्या आहेत.
लंडनमधून मायदेशात परतल्यानंतर दोघेही कॅज्यूअल लूकमध्ये दिसले. अनुष्काने एक लूज टी-शर्ट आणि खाली लूज डॅनिम घातली आहे. तसेच विराटने खाली शॉर्ट, टी-शर्ट आणि त्यावर एक कॅज्यूअल शर्ट घातला आहे. अनुष्काच्या डोक्यावर एक काळ्या रंगाची कॅप आहे, तर विराटनेही खाकी रंगाची कॅप घातल्याचे पाहिले जाऊ शकते.
दरम्यान, विराटच्या फॉर्मचा विचार केला, तर त्याने मागच्या अडीच वर्षांपेक्षा मोठ्या काळापासून एकही शतक केले नाहीये. यादरम्यानच्या काळात विराट चाहत्यांच्या अपेक्षांवर देखील खरा उतरू शकला नाहीये. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून विराट मात्र या दौऱ्यात खेळत नाहीये. माध्यमांतील वृत्तानुसार विराटने निवडकर्त्यांकडे विश्रांती मागितल्यामुळे त्याला दौऱ्यातून वगळले गेले आहे. तसेच आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात देखील विराट खेळताना दिसणार नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी खतरनाक योजना आखतायत भारताचे प्रशिक्षक, गोलंदाजांची बनवतायत फौज
तब्बल १७ वर्षांनंतर ‘हा’ विश्वविजेता संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज, पीसीबीने जाहीर केलं वेळापत्रक
पाकिस्तानविरुद्धचं वादळी अर्धशतक फळाला, स्म्रीतीने मिळवले टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग