आज 16 जून 2024 रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. फादर्स डे च्या निमित्ताने लोक खास स्टोरी आणि पोस्ट शेअर करुन वडिलांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत या खास प्रसंगी अनेक क्रिकेटपटूंनीही आपल्या वडिलांची आठवण काढली आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सुंदर फोटो शेअर केले.
फादर्स डे च्या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या वडिलांसाठी आपलं प्रेम व्यक्त करतो, खास संदेश लिहितो आणि त्यांना या दिवशी शुभेच्छा देतो. क्रिकेट विश्वातही हे दिसून येते, जेव्हा क्रिकेटर त्यांच्या वडिलांची आठवण करुन भावूक होतात आणि त्यांचे फोटो त्यांच्यासोबत शेअर करतात. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी फादर्स डे निमित्त वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने आणि सध्याचा डावखुरा फलंदाज रिंकु सिंगने आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत फादर्स डे शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या वडिलांच्या अनेक छायाचित्रांच्या मदतीने एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये बॅकग्राउंडमध्ये बापू तेरे करके.. हे गाणे लावले आहे. युवराजने आपल्या व्हिडीओमध्ये प्रत्येक संघर्षासाठी वडिलांचे आभार मानले आणि असेही लिहिले की, स्वतः वडील बनल्याने मला माझ्या आई-वडिलांचे अपार प्रेम आणि त्यागाची जाणीव झाली.
View this post on Instagram
टीम इंडियाचा युवा फलंदाज रिंकू सिंगही आपल्या वडिलांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये रिंकू त्याच्या वडिलांसोबत उभी आहे. या पोस्टवर त्याने कॅप्शन लिहिले, पापा माझे प्रेम. यादरम्यान त्याने हार्ट इमोजी देखील लावले. रिंकूने त्याच्या पोस्टवर एक पापा मेरी जान हे गाणे देखील लावले आहे.
अनुष्का शर्माने देखील इंस्टाग्राम अकाउंटवर कोहलीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिने वामिका आणि अकाय यांचे तळव्याचे ठसे रंगाने उमटवून अनोख्या पध्दतीने वामिका आणि अकाय यांचे वडील विराट कोहलीला खास शुभेच्छा दिली आहे. तर धोनीची मुलगी झिवाने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन धोनीचा रील शेअर केली आहे. त्याच्या कॅप्शन मध्ये तिने फॅमेलिया असं लिहलं आहे. पण झिवाचे अकाउंट तिची आई साक्षी वापरते.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, नामिबियाच्या कर्णधाराचं नावं रेकॉर्ड बुकमध्ये नोंदल्या गेलं
गतविजेती इंग्लंडची टीम जशीतशी सुपर 8 साठी पात्र, पुढील वाटचाल मात्र अवघड; जाणून घ्या
ठरलं! गौतम गंभीरच असणार भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक, या दिवशी होणार घोषणा