जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताची स्थिती खराब आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट गमावत 151 धावा केल्या. तसेच, भारतीय फलंदाजीची मोठी जबाबदारी टॉप ऑर्डरवर होती. पण फलंदाजी क्रम पुन्हा एकदा अपयशी ठरला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाले. तर चेतेश्वर पुजाराही आतल्या चेंडूवर बोल्ड झाला. भारतीय फलंदाजी विराट कोहलीवर अवलंबून होती. कोहलीनेही चांगली सुरुवात केली पण त्यानंतर मिचेल स्टार्कच्या चांगल्या शॉर्ट पिच बॉलवर तो देखील बोल्ड झाला.
विराटने 31 चेंडूत 14 धावा केल्या. तर, ओव्हर द विकेट शॉर्ट पिचवर कोहलीला (Virat Kohli) स्पर्श होऊन चेंडू बाहेर पडला. कोहलीला वेळेत बॅट लाइनमधून काढता आली नाही आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागला. दुसऱ्या स्लिपमध्ये तो चेंडू स्टीव्ह स्मिथकडे गेला. हवेत उडी मारताना स्मिथने चांगला झेल घेतला. मात्र, कोहली बाद झाल्यानंतर भारताची धावसंख्या चार खेळाडूंच्या मोबदल्यात 71 धावा झाल्या.
अनुष्काची प्रतिक्रिया झाली व्हायरल
हा सामना पाहण्यासाठी कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharma) ओव्हल मैदानावर उपस्थित होती. कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे.
Anushka Sharma and others can’t believe that wicket of Virat Kohli. A pin drop silence at the oval.#INDvAUS #WTCFinal2023 pic.twitter.com/sk01j6DUvV
— Akshat (@AkshatOM10) June 8, 2023
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला अडचणीत आणले आहे. पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघ अद्याप 318 धावांनी मागे आहे तर फॉलोऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला अजून 119 धावा करायच्या आहेत.
रहाणेच्या हाती भारतीय संघाची धुरा
तिसऱ्या दिवशी भारताचा खेळ अजिंक्य रहाणेवर अवलंबून आहे. कसोटी संघात पुनरागमन करणारा रहाणे 29 धावा केल्यानंतरही नाबाद खेळत आहे. त्याच्यासोबत केएस भरत फलंदाजी करत आहे. तर, भरतने फक्त 5 धावा केल्या आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाने (Ravidnra Jadeja) सर्वाधिक 48 धावा केल्या. जडेजाला ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायनने बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video