क्रिकेटविश्वास सध्या इंडियन प्रीमीयर लीगची धामधूम आहे. पण याच धामधूमीत एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे इंग्लंड महिला क्रिकेट संघाची दिग्गज गोलंगाज अन्य श्रुबसोल हीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तीने १४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द घडवल्यानंतर अखेर थांबण्याचा निर्णय घेतला.
तिने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिच्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात लक्षात राहाणारी कामगिरी म्हणजे २०१७ महिला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तिने भारताविरुद्ध लॉर्ड्स येथे ४६ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. तिच्या या कामगिरीमुळे भारताला त्या विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ३० वर्षीय अन्या श्रुबसोलने दोनवेळा विश्वचषक जिंकला आहे आणि दोनवेळा ऍशेस विजेतेपद कारकिर्दीत जिंकले आहे.
सोमरसेटकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या श्रुबसोलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ कसोटीमध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८६ वनडे सामन्यांत १०६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर तिने ७९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १०२ विकेट्स घेतल्या आहेत. ती वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी इंग्लंडची चौथ्या क्रमांकाची महिला गोलंदाज आहे. तसेच ती आंतरराष्ट्रीय महिला टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी इंग्लंडची गोलंदाज आहे.
14 years 🗓
Countless moments 😁
One incredible career 🙌#ThankYouAnya pic.twitter.com/QU6kFUqxXm
— England Cricket (@englandcricket) April 14, 2022
तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली, तरी ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेचल हेहो फ्लिंट ट्रॉफी, शार्लोट एडवर्ड्स कप आणि द हंड्रेड या स्पर्धांमध्ये खेळणार आहे. निवृत्ती घेताना ती म्हणाली, ‘गेल्या १४ वर्षांपासून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकले, हे माझे मोठे भाग्य आहे. महिला क्रिकेटची प्रगती होत असताना त्यात सहभागी झाल्याने मला अभिमान वाटत आहे. पण आता हे स्पष्ट झाले आहे की, आता हे सर्व खूप वेगाने पुढे जात आहे आणि मला त्या प्रवाहात राहणे शक्य होत नाही. त्यामुळे मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे.'(Anya Shrubsole retires from international cricket)
ती अखेरचे इंग्लंडकडून २०२२ महिला वनडे विश्वचषकात खेळली. तिने या विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच या स्पर्धेत तिने एकून ९ विकेट्स घेतल्या. तिने आत्तापर्यंत टी२० महिला विश्वचषकात खेळताना ४१ विकेट्स घेतल्या असून या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजीमुळे सर्वांच्या मनात भरलेल्या तिलक वर्माची पव्हेलियनमध्ये परतताना शिवीगाळ, Video व्हायरल
अफलातून! भावाने शॉटच असा मारला की, कर्णधार मयंक अगरवालही एकदम खुश; व्हिडिओ पाहाच
Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये