---Advertisement---

नव्या आयसीसी टूर्नामेंटबद्दल विराट कोहलीने केले मोठे भाष्य, म्हणाला…

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 7:14 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदाच खेळल्या जात असणाऱ्या ‘कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धे’ला आयसीसीची सर्वात मोठी ट्रॉफी असे नाव दिले आहे. काल (18 फेब्रुवारी) आयसीसीने 2023 ते 2031 यादरम्यानच्या 9 वर्षात 14 जागतिक स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासंदर्भात विराटने त्याचे मत मांडले आहे.

क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीने सर्व क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांसमोर 2 नव्या आयसीसी स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये टी20 चॅम्पियन्स कप आणि वनडे चॅम्पियन्स कप यांचा समावेश आहे.

या दोन्ही स्पर्धा 4 वर्षांच्या कालावधीत आयोजित करण्याचा विचार आहेे. अशात या दोन्ही स्पर्धा आयसीसीच्या एफटीपीमध्ये(भविष्यातील वेळापत्रक) समाविष्ट केल्या, तर दरवर्षी कमीत कमी एक आयसीसी स्पर्धा आयोजित होईल आणि 9 वर्षात आयसीसीतर्फे एकूण 14 जागतिक स्पर्धा घेण्यात येतील.

21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यापुर्वी, विराटने म्हटले आहे की, “मला असे वाटते की, या सर्व स्पर्धांमध्ये कसोटी चॅम्पियनशीप ही आयसीसीची सर्वात मोठी स्पर्धा ठरेल. उर्वरित स्पर्धा माझ्यासाठी यापेक्षा कमी महत्त्वाच्या असतील. या सर्वांमध्ये ही कदाचित मोठी ट्रॉफी असेल.”

“याबरोबरच लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर प्रत्येक संघाला अंतिम सामना खेळायला आवडेल. आमचीही हीच इच्छा आहे. लवकरात लवकर आम्ही अंतिम सामन्यासाठी पात्र ठरावे आणि कसोटी चॅम्पियनशीप जिंकावी.” असे विराट यावेळी म्हणाला.

“आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमुळे कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक झाले आहे. आम्ही संघ म्हणून या गोष्टी अनुभवल्या आहेत. तरी, मायदेशात खेळण्यासाठी आमच्याकडे अधिक सामने नाहीत. काही सामने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध होणार आहेत. तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा कसोटी मालिकाही कसोटी चॅम्पियनशीपचाच भाग असेल. मायदेशातील हंगामानंतर हा आमचा परदेशातील पहिला दौरा असेल.” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.

https://twitter.com/Maha_Sports/status/1230109648038043648

https://twitter.com/Maha_Sports/status/1230123668606504964

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---