बीसीसीआयने मंगळवारी(16 जूलै) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 जूलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक या पदांसाठी हे अर्ज मागवले आहे.
सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.
पण त्यानंतर बीसीसीआय नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे. पण त्याचबरोबर सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ सदस्यांना या बीसीसीआयच्या पद भरती प्रक्रियेत थेट प्रवेश मिळेल.
त्यामुळे शास्त्रीसंह भारतीय संघाच्या सपोर्टमधील फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर हे पुन्हा या पदांसाठी अर्ज करु शकतात.
असे असले तरी मात्र बीसीसीआयला फिजिओथेरपिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक यांची नव्याने नियुक्ती करावी लागणार आहे. कारण भारताचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हाट आणि शंकर बासू यांनी विश्वचषकानंतर त्यांची पदे सोडली आहेत.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक तसेच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षण पदासाठी तीन पात्रता नियम ठेवले आहेत. यामध्ये या पदासांठी अर्ज करणाऱ्यांचे वय 60 पेक्षा अधिक नसावे, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 2 वर्षांचा किंवा देशांतर्गत क्रिकेट प्रशिक्षणाचा 3 वर्षांचा अनुभव असावा.
तसेच मुख्य प्रशिक्षकाने कमीतकमी 30 कसोटी किंवा 50 वनडे सामने खेळलेले असावेत. तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने 10 कसोटी किंवा 25 वनडे सामने खेळलेले असावेत.
बीसीसीआय नियुक्त करणार असलेल्या नवीन प्रशिक्षण स्टाफचा कालावधी हा 5 सप्टेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. तसेच व्यवस्थापकाचा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकातील पराभवानंतर विलियम्सन म्हणाला, सामन्यात कोणीही पराभूत झाले नाही
–स्टोक्स खेळत होता इंग्लंडकडून पण वडील देत होते न्यूझीलंडला पाठिंबा
–ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनीची वेस्टइंडीज विरुद्ध शानदार कामगिरी