भारत विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर अनेक दिग्गज खेळाडू आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच माजी पाकिस्तानी खेळाडूने रवींद्र जडेजाबद्दल भाष्य केले आहे.
विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. यामध्ये रवींद्र जडेजाला देखील स्थान देण्यात आले होते. जडेजाने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून ३१ धावा केल्या आणि २ गडी बाद केले.
हे प्रदर्शन पाहून, माजी पाकिस्तानी खेळाडू, आकिब जावेद यांनी म्हटले की,”जडेजाला संघात स्थान दिले नसते तरी चालले असते. त्याच्याऐवजी एखादा वेगवान गोलंदाज खेळवता आला असता.”
आकीब जावेद यांनी सलमान बटच्या यूट्यूब चॅनेलवर एका चर्चासत्रात म्हटले की, “जर भारतीय संघाने रवींद्र जडेजाऐवजी वेगवान गोलंदाज खेळवला असता, तर भारतीय संघ आणखी मजबूत स्थितीत असता. परंतु भारत आणि पाकिस्तान संघाची विचारशैली अशी आहे की, परदेशी फलंदाज फिरकी गोलंदाजांना खेळू शकत नाही. परंतु भारतीय संघ अश्विन उपलब्ध असताना, आणखी एका वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देऊ शकले असते. “(Aqib javed statement on Ravindra Jadeja,after India loose WTC final)
भारतीय संघात वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर उपलब्ध आहे. तरीदेखील संघ व्यवस्थापकांनी त्याला दुर्लक्ष केले. शार्दुल वेगवान गोलंदाजीसह तुफानी फटकेबाजी देखील करू शकतो, हे त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखवून दिले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विजय मिळवून देण्यात शार्दुल ठाकूरने मोलाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आक्रमकता आणि मूर्खपणा यात फरक आहे’, रिषभ पंतवर दिग्गजाची बोचरी टीका
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंना ‘मोठा’ धक्का बसण्याची शक्यता
रोहित शर्माकडे विराट कोहली सोपवणार कर्णधारपदाची जबाबदारी? माजी दिग्गजाची भविष्यवाणी होणार खरी?